चित्त तिचे आउटडोअरी!

Sandyanand    30-Jun-2020
Total Views |

travel bloger_1 &nbs


आपण बाहेर जातो तेव्हा घराला मिस करतो, घरातल्यासारख्या सुखसोयी मिळवू पाहतो. या बाईंना मात्र घरात अडकल्यामुळे बाहेरची ओढ लागली आहे. त्यांनी बाहेर असताना काय केलं असतं, ते घरात पुनरावृत्त करून तसे फोटो काढून घेतले आहेत. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी असं म्हणतात. ते किती खरं आहे कोण जाणे! 

माणसांचीही अशीच गत असते. माणसं कुठेही फिरत असली तरी त्यांचं लक्ष त्यांच्या आवडीच्या विषयात रमलेलं असतं. शरीराने माणसं वेगळ्या ठिकाणी असतात, पण मनाने वेगळ्या ठिकाणी असतात. या ट्रॅव्हल ब्लॉगर महिलेची गंमत पाहा. हिच्या पायावर भिंगरी आहे. ही सतत फिरत असते, देशात, परदेशात आणखी कुठे कुठे. तुम्ही म्हणाल, बापजाद्यांनी इस्टेट कमावून ठेवली असेल तर फिरायला काय जातंय या बाईंचं. तर तसं काही नाहीये. या बाई ट्रॅव्हल ब्लॉग लिहितात, ते त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे. 

 
त्या जी भटकंती करतात, त्या भटकंतीचे अनुभव, त्यातून त्यांना काय वाटलं, काय मिळालं, हे त्या लिहितात. एखाद्या ठिकाणी कसे जाल, काय पाहाल, कुठे काय खाल, हे त्या लिहितात आणि ते वाचणारे लोक त्यासाठी काहीएक रक्कम मोजतात. करोनाने जगभरात लॉकडाऊन लादल्यावर लोक घरांत बंदिस्त झाले. या बाईही घरात बंदिस्त झाल्या. पण गंमत पाहा. आपण बाहेर जातो तेव्हा घराला मिस करतो, घरातल्यासारख्या सुखसोयी मिळतील का, असं पाहतो. या बाईंना मात्र घरात अडकल्यामुळे बाहेरची ओढ लागली आहे. त्यांनी बाहेर असताना आपण काय केलं असतं, ते घरात पुनरावृत्त करण्याचा प्रयत्न केलाय आणि तसे फोटो काढून घेतले आहेत.