सेलिब्रिटी टॉक्स शेखर सुमन

Sandyanand    30-Jun-2020
Total Views |


shekhar suman_1 &nbs


मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो तेव्हा लोक कौतुक करतात. काही लोक मला म्हणतात की, तुम्ही कार्यक्रम चांगला होस्ट करता... तेव्हा मी त्यांना म्हणतो की, कार्यक्रम होस्ट करणं म्हणजे काय ते मला माहिती नाही. पण, माझ्यादृष्टीनं कार्यक्रम होस्ट करणं ही एक भूमिका आहे. कार्यक्रमाच्या गरजेनुसार मी त्या भूमिकेला तसे आयाम देत जातो.. त्याच अनुषंगानं मी असं सांगतो की, अभिनेता म्हणजे फक्त तोच नाही, जो चांगल्या भूमिका वठवू शकतो..

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. मी असा विचार करतो की, त्या अभिनेत्यानं त्या भूमिकेसोबत त्याच्या व्यक्तिमत्वाचंही मिश्रण करावं.. जर तसं केल तर दोन्हींमधील ते सामंजस्य कसं दिसेल..? मी चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा दोन्हीं माध्यमात काम केल्यामुळे लोक मला त्यातील फरक विचारतात. तर मी असं म्हणतो की, चित्रपटांमध्ये रिटेक चा फार मोठा आधार असतो. पण, त्याचमुळे अभिनेता बिघडतो. म्हणजे, अमुक एखादी ओळ अशी म्हटली काय किंवा तशी म्हटली काय.. काम चांगलं नाही झालं तर रिटेक करता येईलच, हा विचार असतो. पण, टेलिव्हिजनमध्ये काम करताना मात्र, ही संधी फारच कमी मिळते. कारण, तिथे फारच कमी वेळेत सगळं शूटिंग संपवावं लागतं. मोजक्या वेळेत काम चांगलं झालं पाहिजे, यासाठी नेहमी सजग राहावं लागतं, तंदुरुस्त राहावं लागतं आणि अधिक जागरुक राहावं लागतं हे मी टेलिव्हीजनमध्ये शिकलो आहे. या सर्वच माध्यमांमध्ये काम करत असताना माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे की, काम चांगलं करत राहिलं पाहिजे. मग, ते थिएटर असेल, किंवा टीवी मालिका असतील किंवा मग चित्रपट असतील.   

आता मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा हे लक्षात येतं की, थोडी नाराजी, क्वचित थोडासा आक्रोश असेल. पण, तरीही मला यातून खूप आनंदही मिळालेला आहे. अशावेळी मला दीवार चित्रपटातील एक सुंदर डायलॉग अनेकदा आठवतो. त्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका एका नास्तिकाची आहे. त्यांना आई असं म्हणते की, जेव्हा बाकी सगळे रस्तेच बंद असतील, तेव्हा याही मार्गावरून एकदा चालून बघ.. मीही तेच केलं. मीही तोच मार्ग पत्करला.