मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की शाळेत लायब्ररी पीरियडमध्ये काही मुले गोष्टींच्या पुस्तकावर तुटून पडतात. तुम्ही पाहिले असेल की, ज्या मुलांना गोष्टी वाचण्याची आवड असते, ते अभ्यासातही हुशार असतात. त्यांचा समावेश टॉपर्समध्ये होतो. काही दिवसांपूर्वी एक गोष्ट समोर आली आहे की, जी मुले झोपण्याआधी बरोबर २० मिनिटे आधी गोष्टी वाचतात, त्यांची वाचण्याची आणि अभ्यासाची क्षमता वाढते. गोष्टी वाचण्याचे काय काय लाभ होतात ते पुढे वाचा... (भाग १)
जेव्हा गोष्टीचा अंत काही मजेदार व वेगळा होतो तेव्हा मुले काही नवीन विचार करण्यासाठी, लिहिण्यासाठी प्रेरित होतात.
गोष्टी वाढवितात वाचण्याची क्षमता
मित्रांनो, अमेरिकेतील एका एनजीओने एक मोहीम सुरू केली आहे. ही संस्था मुलांसाठी रात्री २० मिनिटांपर्यंत गोष्टी वाचण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करते. तज्ज्ञ म्हणतात की, जर कोणी मूल दररोज रात्री झोपताना २० मिनिटांपर्यंत गोष्टी वाचत असेल तर त्याच्या वाचण्याच्या क्षमतेत कमीत कमी १० दिवस शाळेत जाण्याइतकी वाढ होते. तसेच मुलांच्या कथांच्या प्रसिद्ध लेखिका लॉरा न्यूमेरॉफ वाचण्याच्या सवयीला विकसित करण्यासाठी प्रकाशन कंपनी फस्ट बुकच्या मदतीने स्लीपीज बेड टाइम स्टोरीज नावाने एक कार्यक्रम चालवत आहे. म्हणजेच गोष्टी वाचून जेथे तुमचे मनोरंजन होते, तेथेच वाचण्याची क्षमताही वाढते. वाचण्याच्या सवयीची सुरुवात आपल्या आवडीच्या साहित्याने होते. पण एकदा ही सवय लागली की, तुम्हाला वाचण्यात मजाही येते. शाळेतून आल्यानंतर तुम्ही होमवर्क- ट्यूशनने थकून जाता, म्हणून सुरुवातीला मजेदार गोष्टी वाचा. कोणतीही वेळ निश्चित न करता तोपर्यंतच गोष्टी वाचा जोपर्यंत तुम्हाला कंटाळा येत नाही. हां, सुरुवातीला काही दिवस तुमच्यामध्ये एक जिज्ञासा जागृत होईल की, गोष्टीत पुढे काय झाले असेल? एकदा तुम्हाला वाचण्याची सवय लागली की तुम्ही जवळच्याच एखाद्या लायब्ररीत गोष्टींची पुस्तके शोधताना आढळून याल.
गोष्ट तणाव दूर करेल
जेव्हा शाळेत नवीन प्रवेश असेल किंवा मग पालक आणि शिक्षक यांच्याकडून जास्त चांगला अभ्यास करण्याचा दबाव असेल, तर ताण येणे स्वाभाविक आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला गोष्टी वाचायच्या नसतील तर आपल्या पालकांना सांगा की, झोपण्याच्या बरोबर आधी त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट वाचून दाखवावी. तुमचा ताण खरोखरच खूप कमी होईल आणि असेही पाहण्यात आले आहे की, रूटिनमध्ये असे झाल्यानंतर तुमच्या पालकांचा ताणही कमी होईल.
गोष्टी क्रिएटिव्ह बनवतात गोष्टी
तुम्हाला लिहिण्यासाठीही प्रेरित करतात. तुम्हाला तीच कहाणी पसंत पडते जिचा अंत तुमच्या विचारांच्या पेक्षा वेगळा असेल. नाहीतर तुम्ही विचार करता, याच्यात नवीन काय होते? ज्याप्रकारे जेव्हा तुम्ही कोणताही चित्रपट पाहायला जाता आणि त्याची कहाणी आणि त्याचा अंत असा असतो की तुम्ही अजिबात कल्पना केली नसेल, तर लेखकासाठी तुम्ही टाळ्या जरूर वाजवाल. तुमचे विचार आणि ती गोष्ट दोन्ही बरोबर चालतात. जेव्हा गोष्टीचा अंत काही मजेदार आणि वेगळा होतो तेव्हा तुम्हीही काही नवीन विचार करण्यासाठी, लिहिण्यासाठी प्रेरित होता. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वाचता, तेव्हा त्यात आलेल्या कल्पनांव्यतिरिक्त तुम्ही नवीन विचारांच्या दिशेने पुढे जाता. आपला मेंदू लावून जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा गोष्टींमुळे तुमच्याजवळ खूप साऱ्या कल्पना असतात. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा स्वत:चा असतो.
झोप चांगली येते
तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त काही मोठेही असा विचार करत असतील की, झोप येत नाही. चला, टीव्ही पाहू या. टीव्ही पाहता पाहता डोळे थकू लागतात आणि झोप आपोआप येईल. येथे जे समोर येत असते, तुम्ही पाहत राहता. आपला मेंदू काहीही करत नाही. त्याव्यतिरिक्त जर कोणी चांगल्या गोष्टीचे पुस्तक वाचेल तर चांगली झोप तर येईलच त्याचबरोबर तुमच्या मेंदूत नवीन विचार आणि काही नवीन करण्याची इच्छा जागृत होईल. उद्याचे काय माहिती, आज चांगल्या झोपेसाठी स्वीकारलेली ही सवय मोठे झाल्यावर तुम्हाला एक प्रसिद्ध लेखक बनवील.
वाचनाची सवय लागल्याने तुम्हाला भाषेचे चांगले ज्ञान होते. तसेच त्याचा उपयोग अभ्यासातही होतो. आणि चांगले गुण मिळण्याची श्नयता वाढते. विविध देशांमधील विविध संस्कृतींचा परिचय होतो. आणि हे सर्व कंटाळा न येता होते...
(क्रमश:)