कसं कराल फोकस?

Sandyanand    29-Jun-2020
Total Views |


focus_1  H x W:


कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे योग्य फोकसची गरज असते. अशावेळेस आपल्याला पाच स्तरांवर फोकस करण्याची गरज असते. आज आपण त्यावर चर्चा करू... 


लाइफटाइम फोकस 
आयुष्यभर तुम्हाला कोणत्या गोष्टीवर फोकस किंवा लक्ष्य केंद्रित करायचं आहे याचा साधा-सोपा अर्थ असा की, तुम्हाला जीवनाचं लक्ष्य निर्धारीत करायला हवं. कोणतीही समजूतदार व्यक्ती निरूद्देश आयुष्य जगू शकत नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणतंही लक्ष्य निर्धारीत न करता चालते, तिचं आयुष्य यशस्वी होण्याची शक्यता नसतेच. म्हणून जीवनात कोणतं ना कोणतं ध्येय ठेवून पुढे जायलाच हवं. हे ध्येय नियोजन पद्धतीने पूर्ण करत राहिलात तर यश नक्कीच मिळेल.  


जीवनाचं लक्ष्य कसं निवडाल?
कोणत्याही व्यक्तीसाठी जीवनाचं ध्येय ठरवणं खूप अवघड असतं. पण हे सुद्धा निश्चित आहे की, लक्ष्य निर्धारीत करणाऱ्या व्यक्तींना पदोपदी त्याचं बक्षीस अवश्य मिळतं. यामुळे व्यक्तीला प्रत्येक पातळीवर योग्य दिशा मिळते. चुकीच्या निर्णयाची क्षमता नाहिशी होते. परिणामी पुढे जाऊन पश्चात्यापाची वेळही येत नाही. सगळ्यात आधी हे शोधून काढा की, तुम्ही गोष्टीला तुमच्या जीवनात खूप महत्त्व देता? त्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय किंवा प्रतिफळाची आशा न करता समर्पित होऊन काम करा. यामुळे यशावर शिक्कामोर्तब होईल.


तुमचं मन कुठे आणि कोणत्या कामात रमतं, तुम्ही काय केल्यानंतर स्वतः ला प्रसन्न आणि तृप्त अनुभवू शकता. हे लवकरात लवकर शोधून काढा. आपल्या आवडीचं काम निवडून ते करण्याने यशाची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यानंतर तुमच्या आवडीची कामं आणि त्या कामाशी तुमचा संबंध शोधून काढा. ज्याला तुम्ही अधिक महत्त्व देता. याचं मिश्रणच जीवनाच्या योग्य उद्देशाच्या रूपात समोर येईल. जीवनाचं ध्येय एकदा स्पष्ट झाल्यानंतर तुम्ही त्यास मिशन स्टेटमेंटच्या रूपात लिहून डोळ्यासमोर ठेवू शकता. केवळ एका ओळीच अत्यंत स्पष्ट आणि सूक्ष्म ध्येय वाक्यच तुम्हाला फोकस बिंदुपर्यंत पोहचवेल.