घरात आणा पॉझिटिव्ह एनर्जी

Sandyanand    29-Jun-2020
Total Views |


energy_1  H x W


एका सर्व्हे
नुसार, ७३ टक्के लोक आपल्या घरांमध्ये सुखी असतात. ते आपल्या जीवनातही खुश असतात. आपल्या सुखाचा १५ टक्के भाग आपल्या घरातील वातावरणातून येतो. घराच्या वातावरणात सकारात्मकता आणून आपणही आपले जीवन सुखद करू शकता. 

योग्य प्रकाश :
फ्लोरल आणि व्हॅनिला सेंटचे कँडल आपले सुख वाढवण्याचे काम करतात. रिलॅक्स वाटण्यासाठी या सुगंधाने घर भरून टाका.

घरातील रोपे :
एका अध्ययनानुसार रोपे घरातील विषाक्त पदार्थ आणि धूळ २० टक्के कमी करू शकतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी रोपे लावा.

भिंतीवरील कलाकृती :
निसर्गासंबंधित कोणतीही कलाकृती भिंतींवर लावा. एका संशोधनात आढळून आले आहे की, पाच मिनिटे हिरवळ वा कोणतेही सार्थक पेंटिंग पाहिल्यास तणावाची पातळी कमी होत असते.

पक्ष्यांची किलबिल :
जर घरात कुठेही एक मोठी खिडकी असेल तर त्याच्या बाहेर एक बर्ड फीडर ठेवा. पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आनंद घ्या. यामुळे तणाव कमी होतो.

सुगंधांचा वापर :
अनेक अध्ययनातून सिद्ध झाले आहे की, अरोमाथेरपी लोकांना आनंदी करण्यात मदत करू शकते. घरात आवडत्या अरोमाची व्यवस्था करा.

ऊन येऊ द्या :
ऊन शरीरात व्हिटॅमिन डीचा स्तर व्यवस्थित करीत असते. त्यामुळे मूड उत्तम होतो आणि मन प्रसन्न राहते. यासाठी प्रत्येक रूममध्ये थोडा वेळ ऊन येऊ द्या.

रंगांचा ताळमेळ :
संशोधन सांगते की, रंग आपला मूड आणि व्यवहारावर खूप परिणाम करीत असतात. यासाठी आपल्या घरातील खोल्यांना व सजावटीसाठी योग्य रंग असावेत.

खिडकी उघडा :
नैसर्गिक प्रकाश आनंदासाठी जबाबदार सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी ओळखला जातो. हा प्रकाश घरात तेव्हाच येईल जेव्हा आपण खिडकी उघडाल.

नीटनेटके घर :
अव्यवस्था तणावाचे कारण असते व सकारात्मक ऊर्जा नष्ट करीत असते. यासाठी घरात जर वस्तूंचा पसारा पडलेला असेल तर त्या व्यवस्थित लावा. टाकाऊ वस्तू बाहेर काढून टाका

फॅमिली फोटो :
संशोधन सांगते की, सकारात्मक जीवनाचे अनुभव दर्शवणारे फॅमिली फोटो आपला मूड बूस्ट करतात. यामुळे घरातील वातावरणात सकारात्मकता झळकते.