गुड कोलेस्ट्रॉल चांगले मानले जात असले तरी त्याचाही दुष्परिणाम होऊ शकता

29 Jun 2020 14:39:15



cholesterol _1  


हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहार नियंत्रित करणे आवश्यक आहे. पण कोलेस्ट्रॉल हा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. गुड कोलेस्ट्रॉल चांगले मानले जात असले तरी त्याचाही दुष्परिणाम होऊ शकतो.


हृदय निरोगी राखण्यासाठी विशेषज्ञ अनेक दशकांपासून हाय डेंसिटी लाइपोप्रोटीन (एचडीएल) म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढविण्याचा सल्ला देत आहेत. तथापि, अमेरिकेतील एमोरी मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार कोणत्याही इतर वस्तूप्रमाणेच गुड कोलेस्ट्रॉलचे अति प्रमाण धोकादायक ठरले आहे. संशोधकांनुसार एचडीएल निश्चितच हृदयरोगाचा धोका कमी करण्यास उपयोगी आहे. पण त्याचे अधिक प्रमाण हृदयाच्या आरोग्याला नुकसान पोहोचविण्याचे कारण ठरू शकते.

एचडीएल वाढविणारी औषधे हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी करण्यात परिणामकारक सिद्ध न होणे हे याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. लॉरा कॉर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनात संशोधकांनी सातत्याने चार वर्षांपर्यंत हृदयरोगाशी झुंजणाऱ्या ६००० ज्येष्ठांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले. या दरम्यान १३ टक्के सहभागींना एक तर हार्ट अ‍ॅटॅक आला किंवा त्यांचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. विशेष गोष्ट अशी की, हार्ट अ‍ॅटॅकने जवळपास सर्व प्रकरणे त्या लोकांशी निगडित होती, ज्यांच्या शरीरात एचडीएलची मात्रा एक तर १.० पेक्षा कमी होती किंवा मग १.४ पेक्षा जास्त. केवळ १.० ते १.४ च्या दरम्यान एचडीएल असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी आढळून आला. 

लॉरा यांनी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी फास्टफूड आणि तेलकट भोजनाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी नियमित व्यायाम करणे सुद्धा आवश्यक सांगितले आहे.

दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल - 

एलडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल)
हे धमन्यांच्या भिंतीवर जबाबदार. रक्तप्रवाहाच्या दरम्यान धमन्यांवर अतिरिक्त दबाव पडल्याने त्यांच्या फाटण्याचा धोका असतो. 
स्त्रोत : फुल क्रीम दूध, लोणी, चीज, क्रीम, फास्टफूड, तेलकट गोड पदार्थ, व्हाइट ब्रेड, नूडल्स पास्ता, चावल, बेकरी उत्पादने, रेड मीट. 

एचडीएल (गुड कोलेस्ट्रॉल) 
हे धमन्यांमध्ये जमणाऱ्या चरबीला सुटे करून लिव्हरमध्ये पाठविते. ज्यामुळे त्यात असलेल्या पोषक तत्त्व वेगळे व्हावेत व शिल्लक घटक शरीराबाहेर काढले जावेत.
स्त्रोत : मोड आलेली कडधान्ये, डाळी, शेंगा, तंतुमय फळे-भाज्या, मासे, ऑलिव्ह ऑइल, बदाम, अक्रोड, जवस आणि तुळशीच्या बिया, अंड्याचा सफेद भाग. ए
Powered By Sangraha 9.0