वेबिनार, मेळाव्यांद्वारे महावितरण साधणार ग्राहकांशी संवाद
वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन, तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांत ग्राहक तक्रार निवारण कक्ष सरू करण्यात आले आहेत. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मेमध्ये सरासरी वापरानुसार वीजबिल देण्यात आले.
सध्या, मीटर रिडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मेसह जूनचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलांबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सरू करण्यात आले आहेत. त्यात जूनच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी आणि शंका दूर करण्यात येतील. तसेच, शहरी भागात मोठ्या रहिवासी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांत आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून, वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत.
ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोरोनासंदर्भात सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासोबतच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहणे सोयीचे झाले आहे. महावितरणने एसएमएसद्वारे ही लिंक ग्राहकांना पाठवली आहे. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीजबिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे,