सतत खुर्चीवर बसणं नुकसानकारक ठरतं

Sandyanand    27-Jun-2020
Total Views |


bac_1  H x W: 0


आराम न करता तासनतास खुर्चीवर बसून राहण्याने आपल्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. म्हणून सतत खुर्चीवर बसणं टाळायला हवं...



जर तुम्ही ऑफिस किंवा घरात खूप वेळ कॉम्प्युटरसमोर बसत असाल तर सावध व्हा. कारण यामुळे आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या व्यक्ती गेल्या एक दशकापासून कॉम्प्युटर टर्मिनलवर काम करत आहेत, त्यांना आतड्याचा कर्करोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. जर गेली दहा वर्षे तुम्ही कॉम्प्युटरवर काम करत असाल आणि वेळ मिळत असेल तेव्हा जिममध्ये जात असाल तरी तुम्हाला बॉवेल कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं मुख्य कारण आहे, काही तास सलग खुर्चीवर बसून रहाणे.

हा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या एका अध्ययनादरम्यान समोर आला. कॅन्सर रिसर्च ऑफ युकेमधील डॉक्टरांच्या मते, आपण जास्तीत जास्त सक्रिय राहून या धोक्याला निश्चितपणे कमी करू शकतो. काडिओलॉजिस्टच्या मते, सतत एकाच जागी बसून राहण्याचा आपल्या आरोग्यावर विपरित होतो. ही समस्या त्या व्यक्तींना अधिक जाणवते ज्या आपल्या दिवसातील बराच वेळ स्क्रिनसमोर घालवतात. याचा परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होतो.

लंडन कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या संशोधनानुसार, अशा व्यक्ती ज्या दिवसभरात अकरा तास काम करतात. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. साधारण ही शक्यता ६७ टक्के एवढी असते. ऑस्ट्रेलियातज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ एकाच जागी बसण्यामुळे कंबर खूप रूंद होतेच शिवाय अनावश्यक कोलेस्ट्रॉल शरीरात जमण्याचा धोकाही टिकून रहातो. युनिव्र्हसिटी ऑफ क्वीसलँडच्या डॉक्टरांच्या मते, कामाच्या दरम्यान एक तासात एक मिनिटाचा ब्रेक घेऊन त्यादरम्यान उभं राहण्यानेही अनेक आरोग्य समस्यांना सहज दूर ठेवता येतं. ब्रिटीश किरोप्रैक्टिक असोसिएशनद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार, आपल्यापैकी एक तृतीयांश लोक दिवसातील कमीत कमी दहा तास खुर्चीवर बसतात. त्यापैकी अर्धे लोक असे असतात, जे आपलं जेवणंही आपल्या जागेवर बसूनच करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच जागी बसून एकाच प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तींना डेमेसिया होण्याची शक्यताही अधिक असते.