ऑनलाइन गेमर्स आता सायबर चोरट्यांचे लक्ष्य

26 Jun 2020 17:21:55
 
 
 
सायबर हल्ल्यांत एप्रिलमध्ये ५४ टक्के वाढ झाल्याचे कास्पेरस्कीचे सर्वेक्षण
 
तुम्हाला कॉम्प्युटरवर ऑनलाइन गेम खेळायचा नाद असेल, तर सावधान! सायबर चोरट्यांनी आता असे गेम खेळणाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली असून, केवळ एप्रिल महिन्यात गेमशी संबंधित सायबर हल्ल्यांमध्ये ५४ टक्के वाढ झाली होती, असे सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील मकास्पेरस्कीफ या फर्मने स्पष्ट केले आहे. मकोव्हिड-१९फमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी करमणूक किंवा वेळ घालविण्याचा मार्ग म्हणून कॉम्प्युटर गेम खेळायला सुरूवात केली आणि त्याचा फायदा सायबर चोरांनी घेतला. खोट्या ई-मेल पाठवून किंवा बनावट संकेतस्थळे तयार करून फसवणूक करणे आता नवीन नाही. त्यात गेमची भर पडली आहे.
 
एखाद्या लोकप्रिय गेमचे फ्रि व्हर्जन देत असल्याचे किंवा त्याचे अपडेट्स आणि ए्नस्टेन्शन विनामूल्य देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरटे त्यांचा काङ्र्मभाग साधत असल्याचे मकास्पेरस्कीफने म्हटले आहे. या आमिषाला गेमचा नाद लागलेले लोक बळी पडतात मालवेअरच्या माध्यमातून त्यांची फसवणूक केली जाते. यूजरचा पासवड चोरून हे हल्लेखोर कॉम्प्युटरमधील सर्व माहिती काढून घेऊ शकतात. ममिनिक्राफ्टफ हा गेम चोरट्यांच्या रडावरवर विशेष असल्याचे मकास्पेरस्कीफचे म्हणणे असून, आतापङ्र्मंत झालेल्या एक लाख तीस हजार वेब हल्ल्यांत या गेमचे नाव आले आहे. त्याशिवाय मकाऊंटर स्ट्राइक : ग्लोबल ऑफेन्सिव्हफ आणि मद विचर-३फ या गेमवरही सायबर चोरट्यांचे लक्ष आहे. मकॉम्प्युटरवर लोकप्रिय असलेल्या गेमचे पायरटेड व्हर्जन मिळविण्याच्या प्रयत्नांत सायबर हल्लेखोरांनी पाठविलेल्या खोट्या qल्नसना बळी पडतात आणि गेम न मिळता त्यांचे नुकसानच होते.
Powered By Sangraha 9.0