जगभरात सायकलला वाढती मागणी पुरवठा कमी

Sandyanand    26-Jun-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
 
पुणे हे सायकलींचे शहर आहे, असे म्हटले जात असे. आता या सायकलींच्या जागी दुचाकी आल्या आहेत. मात्र, कोव्हिड-१९ आजारामुळे सगळे जग सायकली विकत घेत आहे. कारण साथरोगाच्या काळात सार्वजनिक वाहनांऐवजी स्वतःचे वाहन असणे, अधिक उपयुक्त ठरू शकते. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेसह अन्य काही देशांमध्ये सायकलींची खरेदी अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्राची पिछेहाट होत असताना सायकल उद्योगाने मात्र भरारी घेतली आहे. अमेरिकेतील ही वाढ गेल्या ५० वर्षांमधील सर्वाधिक वाढ समजली जात आहे. इटलीतील रोममध्ये तर चक्क सायकलसाठी नव्या लेन करण्यात आल्या आहेत. लंडनमध्येही शहाराच्या मुख्य भागात मोटारींवर तात्पुरती बंदी आणण्याचा विचार सुरू आहे.
 
फिलिपिन्समधील मनिला येथील सायकलींच्या दुकानदाराने सायकलींना ख्रिसमसच्या काळापेक्षाही अधिक मागणी आहे, असे सांगितले. सायकलींच्या मागणीतील वाढ ही सुरक्षित वावराच्या दृष्टीने झाली आहे. बहुतांश लोक आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी सार्वजनिक वाहनांना पर्याय शोधू लागले आहेत. त्यातून सायकलचा पर्याय सर्वोत्तम असल्याचे लक्षात आले. कारण सायकलमुळे प्रदूषण होत नाही; तसेच उत्तम व्यायामही होतो. मसाथरोगाआधीच्या काळात व्यायाम हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य बाग होता,फ असे दक्षिण दिल्लीतील साहिल सिन्हा याने सांगितले. भारतामध्ये सायकलींच्या खपात वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे श्रमिक आपापल्या गावांमध्ये जाण्यासाठी सायकलीचा वापर करीत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका १५ वर्षांच्या मुलीने आपल्या पित्यासमवेत घरी जाण्यासाठी बाराशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हजारो मजूर सायकलीवरून आपापल्या इच्छित स्थळी गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. दरम्यान, सायकलींची मागणी वाढली असली, तरी सध्या पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत.