विषाणूवर लशीसाठी जगभर संशोधन सुरू असून त्याला मदत व्हावी या हेतूने १०३ वर्षाचे आजोबा चक्क मॅरेथॉन स्पर्धेत उतरले असून ती येत्या ३० जून रोजी पूर्ण होणार आहे.मॅरेथॉन सुमारे ४२ किलोमीटरची आहे आणि तीत निवृत्त झालेले ब्रुसेल्समधील डॉक्टर अल्फोन्स लिम्पोएल्स वयाच्या१०३ व्या वर्षी सहभागी झाले ही खचितच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.एक जूनपासून डॉक्टर आजोबा पळत आहेत आणि त्यांचा उत्साह दांडगा आहे.
ते दररोज आपल्या बागेत सकाळी आणि सायंकाळी १४५ मीटरच्या १० फेऱ्या पळत आहेत. १०० वर्षाच्या टॉममूर या माजी जवानाने केलेल्या प्रयत्नांपासून आपण पळण्याची स्फूर्ती घेतल्याचे अल्फोन्स सांगतात. मूर यांनी सुमारे २५० कोटी रुपये त्यातून मिळवूनदिले. अल्फोन्स यांची नात मॅरेथॉनपळते. आता तेही वेगळ्या अर्थानेसह्भागी आले आहेत. घराजवळच्यायुनिव्हर्सिटी ऑफ ल्युवेनसाठी यातून निधीउभारला जाणार आहे. आतापर्यंत ६०००युरो जमा झाले आहेत.
<।िपली;ि