पेशींच्या मजबुतीसाठी काही आवश्यक गोष्टी...

Sandyanand    19-Jun-2020
Total Views |


mus_1  H x W: 0


नियमित दिनचर्येत आपण अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा परिणाम आपल्या पेशींवर होत असतो. अशावेळेस रोजच्या जीवनशैलीत काही बदल केले तर निश्चित फायदा होईल...

वय वाढतं तसं पेशींचं क्षरण होतं. अठरा ते वीस वयात आपण जेव्हा जिममध्ये जाण्यास सुरूवात करतो, तेव्हा सुद्धा हे सुरू होतं. सामान्यतः एका व्यक्तीच्या एका वर्षांत ८०० ग्रॅम पेशींचं क्षरण होतं. ही प्रक्रिया साधारण वयाच्या पन्नाशीपर्यंत सुरू रहाते. शारीरिक श्रम न करणे, पुरेशी झोप न घेणे, सतत बसून राहण्याने पेशी कमजोर होतात.

स्मोकिंग आणि अल्कोहोल हे वृद्धावस्थेत पेशींची मजबूती कमी होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय मधूमेह, रूमेटाइड, आथ्र्राइटिस आणि अन्य अनुवंशिक आजारही पेशींना कमजोर करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वेळीच त्यावर इलाज करायला हवा.

मधुमेह आणि आथ्र्राइटिसला नियंत्रित ठेवायला हवं. या समस्या होऊ शकतात पेशी कमजोर होण्याने थकवा जाणवतो. यामुळे मेंदुचे संकेत पेशींपर्यंत योग्यरित्या पोहचत नाहीत. ज्याचा परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो. हसण्यास किंवा चेहऱ्यावरील इतर भाव व्यक्त करण्यास समस्या. चालणं, उभे रहाणे, बसणे या क्रिया करतानाही त्रास जाणवणे.

साशंक होणे, बोलणे किंवा समजणे यामध्ये अडचणी येणे. छातीमधील पेशीही कमजोर होणे, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे. यामुळे चेतना, एकाग्रता यामध्ये कमतरता निर्माण होते. हे करण्याने समस्या राहील दूर पेशींचा झोपेशी संबंध झोपेचा पेशींची निर्मिती आणि शरीराची दुरूस्ती करणे यांच्याशी खूप जवळचा संबंध आहे. सात ते नऊ तासांची झोप आरोग्य आणि वर्कआऊटच्या रिकव्हरीसाठी फायदेशीर ठरते.

खनिजं आणि जीवनसत्त्व योग्य वेळेस योग्य आहार आणि व्यायामानंतर योग्य आहाराचं सेवन करणे खूप आवश्यक आहे. संतुलित आहारात अमिनो अ‍ॅसिडस, जीवनसत्त्व आणि खनिजं असणं गरजेचं आहे. जंक फूड सोडा हाय कॅलरीयुक्त आहाराच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो.

 ज्यामुळे पेशी कमजोर होतात. म्हणून नियमितपणे चीज किंव हाय कॅलरीयुक्त डाएटपासून दूर रहायला हवं. रोज सकाळी एक सफरचंद नियमितपणे रिकाम्या पोटी एक सफरचंद खाण्याने मृत पेशी पुन्हा तरूण होतात. यामध्ये असणारी अँटीऑक्सड्ंट घटक पेशींना मदत करत. पेशींचा ७५ टक्के भाग हा पाण्याने तयार झालेला असतो. म्हणून पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याने पेशी मजबूत होण्यास मदत होते. अल्जाइमर असोसिएशनने केलेल्या संशोधनानुसार, नियमित व्यायाम करण्याने पेशी मजबूत होतात. त्याचबरोबर पार्किंसन, अल्जाइमर, डिमेंशिया यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये झालेल्या अध्ययनानुसार, बीटाचा ज्यूस पिण्यानेही पेशी तेरा टक्के जास्त मजबूत होण्यास मदत होते.