नाजूक डोळ्यांना वाईट सवयींची बाधा नका

Sandyanand    19-Jun-2020
Total Views |मद_1  H x W: 0


अतिथंड
, अतिउष्ण वातावरण, प्रदूषणामुळे दृष्टीवर होतो परिणाम

चांगला गॉगल वापरून डोळ्यांचे रक्षण करा

कॉन्टॅक्ट लेन्स काळजीपूर्वक वापरा, स्क्रीनपासून अंतर ठेवा, पुरेशी झोपही घ्या

डोळे म्हणजे आपल्या चेहऱ्याचा आरसा असतो. त्यांच्यामुळे आपल्याला हे जग दिसत असते. क्षणभर डोळे मिटून चालणेही शक्य होत नाही एवढे त्यांचे महत्त्व आहे. डोळे नाजूक असल्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. प्रदूषण, कामाच्या वाढलेल्या तासांमुळे कमी झालेली झोप आदी घटकांचा डोळ्यांवर परिणाम होत असतो. आपल्या काही वाईट सवयीसुद्धा डोळ्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. त्यात १४ सवयी जास्त घातक आहेत. त्या टाळल्या, तर वर्षानुवर्षे आपले डोळे निरोगी राहून आपल्याला हे सुंदर जग दाखवित राहतील...

१) एअर कंडिशनिंग आणि सेंट्रल हिटिंग उन्हाळा आणि थंडीपासून बचावासाठी एअर कंडिशन आणि सेंट्रल हिटिंगचा उपयोग होत असला, तरी त्याचा परिणाम दृष्टीवर होतो. सतत अशा वातावरणात राहिल्यामुळे डोळे कोरडे पडतात. डोळे कोरडे पडणे म्हणजे फार घाबरण्याचे कारण नाही हा समज दूर करा. कारण आपण समजतो त्यापेक्षा त्याचे परिणाम घातक असतात. कोरड्या वातावरणामुळे डोळ्यांमधील आर्दता कमी होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. शिवाय डोळे कोरडे पडून त्याचा परिणाम दृष्टी मंदावण्यावर होतो. यावर उपाय म्हणजे तुमच्या झोपण्याच्या खोलीत एअर ह्युमिडिफायर लावा आणि तो रात्रभर चालू ठेवा. तो नसेल तर एक किंवा दोन भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवा. त्यातील पाणी हळूहळू उडेल आणि खोलीतील आर्दता वाढेल. त्यामुळे डोळ्यांना ओलावा लाभून ते कोरडे पडण्याची भीती टळेल.

२) गॉगल किंवा सनग्लासेस वापरणे केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर शक्यतो सर्व ऋतूंमध्ये बाहेर पडताना गॉगल वापरा. त्यामुळे वातावरणातील अतिनील किरणांपासून (यूव्ही) डोळ्यांचे रक्षण होईल. वातावरणातील बदलांमुळे सूर्याचे किरण दिवसेंदिवस प्रखर होत असून, अतिनील किरणांच्या संपर्कात आपण जास्त वेळ येतो आहोत. अशा किरणांबरोबर जास्त काळ संपर्क येण्यामुळे डोळ्यांचे विकार होतात. त्यात डोळ्यांचा कर्करोग, मोतीबिंदू किंवा पेट्रिजिम (Pterygium) यांचा समावेश असू शकतो. (पेट्रिजिम म्हणजे नेत्रावरणाचा जाडसर गुलाबी भाग). चांगल्या प्रतीच्या गॉगलमुळे डोळ्यांचे प्रखर किरणांपासून रक्षण होत असल्यामुळे थंडीतही गॉगल वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

३) मेकअप रिमूव्हरचा अयोग्य वापर डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी त्यांना मेकअप केला जातो. तो करायला हरकत नाही; पण डोळ्यांची काळजी घेऊन करा. विशेषत: मेकअप काढताना जास्त खबरदारी घ्या. डोळ्यांना मेकअप करताना साहित्य उत्तम दर्जाचे वापरा आणि ते डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. आय मेकअप रिमूव्हर आणि फेसवॉशमध्ये काही रासायनिक घटक असतात. त्यात बेन्झाल्कोनियम क्लोराइडचा समावेश असतो. त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊन डोळ्यांतील पेशींची हानी होते. हा घटक नसलेली उत्पादने डोळ्यांसाठी सुरक्षित असल्याने आय मेकअप रिमूव्हर वापरताना पूर्ण खबरदारी घ्यावी.

कॉन्टॅक्ट लेन्सचा चुकीचा वापर घातक

चष्म्याला पर्याय म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना स्वच्छतेबाबत सर्वोच्च काळजी घ्यायला हवी. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच त्या वापराव्यात. पण, अनेकदा या लेन्स थेट डोळ्यांत घातल्या जातात. पण, तसे करणे धोक्याचे आहे. लेन्ससह झोपू नका किंवा त्या पाण्यातही ठेवू नका. तसे केल्यास, डोळ्यांची भरून न येणारी हानी होऊ शकते. शिवाय संसर्गही होतो. झोपताना डोळ्यांमध्ये असल्या तरी चालतील अशा काही लेन्स असल्या, तरी धोका पत्करू नका.

लेन्सच्या आयुष्यापेक्षा जास्त काळ त्या वापरू नका आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित नसलेल्या लेन्स तर मुळीच घेऊ नका. कारण या दोन्ही प्रकारांत डोळ्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. अशा लेन्समुळे डोळ्यांमध्ये ओरखाडे पडून त्यात जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होण्याची वीस टक्के शक्यता असते.

५) अपुऱ्या झोपेचा फटका - डोळ्यांची कार्यक्षमता कायम राहण्यासाठी रोज किमान पाच तास विनाव्यत्ययाची झोप आपल्याला मिळायला हवी असे वैद्यकशास्त्र सांगते. पण, अपुरी झोप आणि अतिश्रमांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडून डोळ्यांची उघडझाप कमी होणे, डोळ्यांतील रक्तवाहिन्या सुजणे, डोळे कोरडे पडणे, दृष्टी अंधूक होणे आदी लक्षणे दिसू लागतात. याचा अतिगंभीर परिणाम स्लीप अ‍ॅप्निया हा विकार होण्यात होऊ शकतो. (झोपेत श्वसनक्रिया बंद होऊन श्वास घेण्यात अडथळा येणे). काही वेळा काचबिंदू (ग्लुकोमा) होऊन दृष्टी जाण्याचा धोकाही असतो. त्यामुळे पुरेशी झोप घेऊन डोळे निरोगी ठेवा.

६) विमान प्रवासामुळे होतो परिणाम - काम किंवा अन्य कारणांमुळे तुम्हाला वारंवार विमान प्रवास करावा लागत असेल, तर डोळ्यांची काळजी घ्या. विमानातील रिसायकल्ड हवा कोरडी असते आणि कल्पनाही करता येणार नाही एवढे जंतू त्यात असतात. त्यामुळे विमानाने प्रवास करताना डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. विश्रांती घेताना किंवा झोपताना आय मास्क वापरा. दीर्घ पल्ल्याचा विमान प्रवास असेल, तर आय मास्क आवर्जून वापरा. काळजी न घेतल्यास, डोळे कोरडे पडून त्रास सुरू होईल. वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांनी डोळ्यांच्या आरोग्याची जास्त खबरदारी घ्यावी.

७) उपकरणांचा दीर्घ काळ वापर - कोणत्याही स्क्रीनसमोर खूप वेळ बसणे डोळ्यांना घातक असते. मग तो स्क्रीन कॉम्प्युटरचा असो, मोबाईलचा असो किंवा टीव्हीचा. दीर्घ काळ एखाद्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहण्यामुळे (नजर खिळवून बसल्याने) डोळ्यांवर ताण पडतो. ड्राय आयच्या रूपाने त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यात भर पडली आहे ती कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमची (सीव्हीसी). सतत स्क्रीनकडे पाहत राहण्याने डोळ्यांवर ताण पडून डोकेदुखी, मान आणि खांद्यांमध्ये वेदना, दृष्टी अंधूक होणे आणि डोळे कोरडे पडणे ही सीव्हीसीची लक्षणे आहेत. हा त्रास रोखण्यासाठी आदर्श, आरामदायी स्थितीत कॉम्प्युटरसमोर बसावे, कॉम्प्युटर स्क्रीनचा लाइट डोळ्यांना त्रासदायक होणार नाही असा ठेवावा आणि कॉम्प्युटर व्यवस्थित स्थितीत असावा. तसेच काम करताना अधूनमधून डोळे मिटून त्यांना थोडी विश्रांती द्यावी.

८) धूम्रपान - धूम्रपानाचे दुष्परिणाम केवळ हृदय आणि फुप्फुसांवर नव्हे, तर डोळ्यांवरही होतात हे लक्षात ठेवा. रोज वीस किंवा त्यापेक्षा जास्त सिगारेटी ओढणाऱ्यांना रंगांधळेपणाचा धोका रोज १५पेक्षा जास्त सिगारेटी न ओढणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळले आहे. काचqबदू, मोतीqबदू, डोळ्यांचे स्नायू कमकुवत होणे आदी विकारांमागे धूम्रपान हे एक कारण असल्याचे दिसून आले आहे.

९) आय मेकअप ठेवून झोपणे - डोळे सुंदर दिसण्यासाठी केलेला मेकअप तसाच ठेवून झोपणे घातक असते. त्यामुळे डोळ्यांना घाणीचा संसर्ग होऊन दृष्टीवर त्याचा परिणाम होतो. पापण्यांनाही त्याचा फटका बसतो. बराच काळ पडून राहिलेले मस्कारा किंवा आय लायनर तसेच वापरले
, तर डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने वापरत असाल, तर ती त्यांची वापराची मुदत संपण्यापूर्वी वापरा. महत्त्वाचे म्हणजे, झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप योग्य पद्धतीने उतरविण्याचे विसरू नका.

१०) वारंवार डोळे चोळणे - थकवा कमी करण्यासाठी डोळे सहसा चोळले जातात. त्यामुळे जरा आराम वाटतो. पण शक्य असेल
, तर ही सवय सोडा. घरातल्या छोट्यांनाही ते सांगा. कारण वारंवार डोळे चोळण्याच्या सवयीमुळे कोरोनाला त्रास होऊन दृष्टीवर परिणाम होतो आणि केराटोकोनुस हा दृष्टिविकार होऊ शकतो. नजर अंधूक होणे किंवा दोन प्रतिमा दिसणे, जवळचे पाहण्यास त्रास होणे ही त्याची लक्षणे असतात. लहान मुलांमध्ये प्रकाशाबाबतची संवेदना तीव्र होऊ शकते. त्यामुळे डोळे चोळण्याची सवय बंद करून डोळ्यांना आराम द्या.

११) औषधांचे परिणाम - काही औषधांचा परिणाम डोळ्यांवर होतो. अँटिहस्टामाइन
, अँटिडिप्रेसन्टस्, कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे, गर्भनिरोधक गोळ्या आणि अन्य काही औषधांमुळे डोळे कोरडे पडतात. काही अँटीबायोटिक्समुळे डोळ्यांच्या प्रकाश संवेदनशीलतेवर परिणाम होतो. पार्किनसन्स, तसेच नैराश्य कमी करणाऱ्या औषधांमुळे काचबिंदू होऊ शकतो. एखादे नवे औषध सुरू केल्यावर दृष्टीवर परिणाम होत असल्याचे जाणवल्यास लगेच डॉक्टरांची मदत घ्या.

१२) आय ड्रॉप्सचा अतिवापर - डोळ्यांची लाली कमी करण्यासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी आय ड्रॉप वापरत असाल
, तर डॉक्टरांना विचारून ते किती काळासाठी वापरावयाचे याची माहिती घ्या. कारण आय ड्रॉप्सचा अतिवापर डोळ्यांसाठी अयोग्य असतो. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसारच ते वापरा.

१३) अयोग्य आहार आणि बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता - अयोग्य आहारामुळे बी १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा फटका डोळ्यांना बसतो. शाकाहारी आणि वेगन लोकांमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता आढळणे नेहमीचे आहे. ती दूर करण्यासाठी सामन
, ट्यूनासारखे मासे, सुकामेवा अशा ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. बी जीवनसत्त्व आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असलेल्या अंड्यांचा आहारात समावेश करावा आणि मोठ्या पानांच्या हिरव्या भाज्या, कोबी, तसेच पालक यांचे प्रमाण आहारात वाढवावे. संत्री, गाजरे आणि आंबेही खावेत.

१४) दुय्यम दर्जाचे गॉगल वापरणे - गडद रंगाच्या काचा असलेल्या गॉगलमुळे सूङ्र्म किरणांपासून डोळ्यांचे रक्षण होते हा गैरसमज आहे. उत्कृष्ट दर्जाचे गॉगल बाजारात विक्रीला येण्यापूर्वी त्यांची यूव्ही चाचणी करून खात्री केली जाते. त्यामुळे थोडा जास्त खर्च करा
, पण यूव्ही किरणांपासून डोळ्यांच्या संरक्षणाची हमी देणारे गॉगलच वापरा.