महिलांना पोटदुखी होण्याची काही कारणे...

Sandyanand    19-Jun-2020
Total Views |


Adeb_1  H x W:साधारण ७७ टक्के प्रजनन क्षमता असणाऱ्या महिलांपैकी ३० टक्के महिला एंडेनोमायसिसने ग्रस्त असतात. याविषयी काही प्रश्न आणि उत्तरं...


महिलांमध्ये ऐडेनोमायोसिसची समस्या काय आहे? -

महिलांमधील गर्भाशयाशी संबंधित आरोग्य समस्या म्हणजे ऐडेनोमायोसिस. यामध्ये गर्भाशयाच्या पेशींच्या आतील लाइनिंग टिश्यूचं स्थानांतरण चुकीच्या ठिकाणी होतं. ज्यामुळे पेशींना सूज येते. गर्भाशयाचा आकार वाढतो. साधारण ७७ टक्के प्रजनन क्षमता असणाऱ्या महिलांपैकी ३० टक्के महिला एंडेनोमायसिसने ग्रस्त असतात. एका अनुमानानुसार, त्यापैकी चाळीस टक्के महिलांना उपचारांची गरज असते. ज्यामध्ये काही महिलांना गर्भाशय काढून टाकावं लागतं. या प्रक्रियेत भावनिक, शारीरिक, आर्थिक कष्ट झेलावे लागतात. तर इतर महिला औषधांवर आश्रित राहू शकतात. यामुळे एंडोमेट्रियलची ग्रहणशीलता कमी होते आणि उच्च गर्भपात होण्याने वांझपण येऊ शकते. सामान्यतः ही स्थिती वयाच्या पत्तीशी ते पन्नाशीदरम्यान महिलांमध्ये येते.

ऐडेनोमायोसिसची समस्या होण्यास कोणती कारणं जबाबदार ठरतात? -

सध्यातरी ऐडेनोमायोसिसचं कारण अज्ञात आहे. गर्भाशयाच्या आतील लायनिंग आणि पेशींच्या मधील बाधा तोडू शकतो. म्हणजे एक सीजेरियन सेक्शन, ट्यूबल बधांब, गर्भावस्थेची समाप्ती आणि अन्य गर्भावस्थेच्या अवस्थेत ही समस्या होऊ शकते. यामध्ये रूग्णाच्या गर्भाशयाचा आकार वाढते. अल्ट्रासाऊंडद्वारेही ही समस्या लक्षात येत नाही. जर मायोक्टोमी करावी लागली तर हे समजणं आणखीनच अवघड जातं.

ऐडेनोमायोसिसचं मुख्य लक्षण आहे अधिक रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या मोठ्या गुठळ्या पडणे, खूप वेळ रक्तस्त्राव होणे यामुळे असं वाटतं की ८-१४ दिवस मासिक पाळी सुरू आहे. अंडोत्सर्गात वेदना वाढतात, पोट आखडल्यासारखे वाटणे, रक्ताची कमतरता निर्माण होते, पोटाच्या खालच्या भागात, पोटात आणि कंबरेत वेदना होतात. पोटाच्या मागच्या भागात जडपणा किंवा दबाव जाणवतो, सतत लघवीला लागणे यामुळे पोटाचा आकार वाढतो.

या समस्येवर काय उपचार? बचावासाठी काय करावं? - महिलांमध्ये मासिक पाळी रोखण्यासाठी तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत जीएनआरएचए एगोनिस्टचं इंजेक्शन दिलं जातं. ज्यामुळे गर्भाशयाला आलेली सूज कमी होते. जर समस्येची तीव्रता अधिक असेल तर दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. सूज आलेल्या पेशींना काढून टाकून गर्भाशय सुरक्षित ठेवले जाते.


ऐडेनोमायोसिसवर कोणताही पूर्ण उपचार नाही. पण काही उपाय आजमावून त्यामुळे होणाऱ्या समस्यांना दूर ठेवता येतं. महिलांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन असे घटक असतात, जे मासिक पाळीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं सेवन मासिक पाळीची प्रक्रिया नियंत्रित करते. ज्यामध्ये ऐडेनोमायोसिसमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांपासून संरक्षण मिळवता येते. जास्त वेदना होत असतील तर हिटिंग पॅडचाही वापर करता येतो. ऐडेनोमायोसिसची समस्या दूर ठेवायची असेल तर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तसंच वेळीच उपचार करा.