मोहरीच्या तेलात भरपूर व्हिटॅमिन्स असतात. हे व्हिटॅमिन्स बॉडीचे मेटॅबोलिझम प्रोसेस वाढवतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मोहरी म्हणजेच राई आपण रोजच्या भाजीत वापरतो. ती नसेल तर भाजीत कमतरता जाणवते. चवीची नाही तर भाजीत दिसण्यात रसरशीत दिसत नाही. तेलात मोहरी फुटली की घराला स्वयंपाकाची चाहुल लागते. ती मोहरी आरोग्यदायी आहे. मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय मोहरीच तेलही तेवढंच गुणकारी आहे. त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही.
खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल.
मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात आणि प्रयोग नियमित केल्यास दात खराब होत नाहीत. त्यामुळे दात साफ करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करा.
मोहरीच्या तेलाने रॅशेसपासून सुटका होते. यात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होण्यारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करा.
कापूरमिश्रित मोहरी तेल केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत आणि ते घनदाट होतात. रोज मालीश केल्याने डोकं शांत राहतं आणि झोपही चांगली लागते. केस काळे करायचे असेल तर मोहरीचं तेल वापरा.
शरीरावर आलेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचं चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने लवकर आराम पडतो.
मोहरी उष्ण असल्याने वात बरा करते, म्हणून संधीवातावर मोहरीचं तेल अत्यंत गुणकारी असतं.
दररोज फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात. सगळ्यांना अॅसिडीटीचा त्रास असतो. त्यामुळे आहारात मोहरी वापरल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात.
मोहरीच्या तेलात भरपूर व्हिटॅमिन्स असतात. हे व्हिटॅमिन्स बॉडीचे मेटॅबोलिझम प्रोसेस वाढवतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लकवा, कंबरदुखी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांत रुग्णांच्या हातापायांना मोहरीच्या तेलाने मालीश करावं.