चेहऱ्यावर मुरूम येऊ नयेत यासाठी काय करता येईल?

07 May 2020 12:32:47



सुंदर चेहरा प्रत्येकासाठीच आकर्षणाचा विषय ठरतो. पण अशा चेहऱ्यासाठी त्वचा निरोगी असणं खूप आवश्यक आहे. जर त्वचा निरोगी नसेल तर चेहऱ्यावर मुरूम येऊ शकतात व तुमच्या साैंदर्यात अडथळा ठरू शकतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्याची देखभाल कशी कराल ज्यामुळे तो आकर्षक दिसेल, जाणून घ्या... 


वयाबरोबर आपल्या त्वचेमध्येही बदल होतात. अशावेळेस सुंदरशा चेहऱ्यावर मुरूमांचं जाळं पसरलं तर साैंदर्याला डाग लागतो. चेहरा बेदाग आणि चम कदार दिसावा यासाठी, प्रयत्न तर करायलाच हवेत. यामुळे तुमचा चेहरा स्तुतीस पात्र ठरतो. पण हे शक्य कसं होईल, जेव्हा वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागेल. सुरूवातीपासूनच काळजी घेतली तर तुमच्या साैंदर्याच्या आड मुरूम येणार नाहीत... 

चेहरा सतत धुवा : चेहऱ्यावर येणारे पिंपल्स हे एक प्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन असतं. धूळ, प्रदूषण, माती आणि घाम आपल्या चेहऱ्याला आजारी पाडतात. म्हणून चेहरा पुन्हा पुन्हा धुणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक वेळेस साबण किंवा फेसवॉशचा वापर करायला हवा असं नाही. स्वच्छ पाण्याने चेहरा धुत रहायला हवं. साबणाने सतत चेहरा धुण्याने चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं. चेहऱ्याची त्वचा रूक्ष होते.

त्वचा तेलकट असेल तर : जर तुमची त्वचा तेलकट असेल तर आहारापासून ते आंघोळीपर्यंत कोणत्याही तेलकट गोष्टीचा वापर करणं टाळा. अशा फेसवॉशचा वापर करू नका, जे ड्राय स्किनसाठी तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर चॉकलेट आणि खूप तेलकट पदार्थांचं सेवन करणंही टाळा. 

कोंड्याला ठेवा दूर : कोंडा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. यामुळे आपल्या त्वचेसाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. केस घाण असतील तर त्याचा परिणाम त्वचेवर मुरूम येण्यात होतो. म्हणून केसांची स्वच्छता आवश्यक आहे. जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर त्यावर इलाज करा. आठवड्यातून एकदा अँटी डँड्रफ शँपूचा वापर करा. तरीही सुधारणा दिसली नाही तर एखाद्या त्वचा तज्ज्ञांना भेटा. 

मुरूमांना हात लावू नका : जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम, पुरळ आलाच तर त्याला सतत हात लावणे, तो फोडण्याचा प्रयत्न करणे अशा चुका करू नका. यामुळे बॅक्टेरिया पसरेल आणि चेहऱ्याच्या इतर भागातही मुरूमांची समस्या निर्माण होईल. 

डॉक्टरांना भेटा : अनेकदा आपण चेहऱ्यावरील मुरूमांकडे दुर्लक्ष करतो. अनेक दिवस मुरूम राहतात आणि आपण स्वतःच त्यावर उपचार करतो. यामुळे मुरूम तर जातात पण डाग मागे राहतात. अशावेळेस मुरूमांकडे जास्त वेळ दुर्लक्ष करता कामा नये. जेवढा जास्त वेळ लावाल, तेवढे जास्त डाग राहतील. मुरूमांची समस्या जर बरी होत नसेल तर डॉक्टरांकडे त्वरीत जा. 

खूप पाणी प्या : त्वचेला सुंदर आणि कोमल बनविण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय स्वतःला लावून घ्या. ज्यांचं वय वीस पेक्षा जास्त आहे, त्यांनी दिवसभरात कमीत कमी सहा लिटर पाणी प्यायला हवं. 

फळं आणि पालेभाज्या खा : त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी फळं आणि पालेभाज्या यांचं भरपूर प्रमाणात खा. चांगल्या त्वचेसाठी फेशियलवर पैसे खर्च करण्यापेक्षा चांगल्या आहारावर खर्च करा. आहार चांगला असेल तर त्वचा चमकेल. 

घाणेरडे हात लावू नका : तसं बघायला गेलं तर आपले चेहऱ्याला कधीही लावता कामा नये. पण आपण अनेकदा आपल्या हाताचा स्पर्श सारखा चेहऱ्याला करत असतो. दिवसभराची कामं करत असताना आपले हात खूप घाण होतात. म्हणून हात स्वच्छ धुवा आणि मगच चेहऱ्याला हात लावा, म्हणजे संसर्ग होणार नाही. 
Powered By Sangraha 9.0