फ्रीजमध्ये अन्न किती दिवस टिकते?

06 May 2020 14:08:50




सध्या तर जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे. अशावेळी ताजे गरम अन्नपदार्थ खाणेच उत्तम असते, असे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या शिळे अन्न खाऊच नका.


आपण आधीच्या रात्रीचे उरलेले अन्न टाकून देत नाही. फ्रीजमध्ये ठेवून ते दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याचा विचार असतो. मात्र असे केल्याने पोटदुखी किंवा पोटाचे इन्फेक्शन होण्याचाही धोका असतो. त्यामुळे याबाबत विज्ञान काय सांगते हे जाणून घतेल तर त्याचा बराच फायदा होतो. कोणते अन्नपदार्थ किती दिवस ठेवू शकता याची माहिती जाणून घेतल्यास चांगलेच असते.


घरी बनवलेल्या पोळ्या दोन दिवसांहून जास्त दिवस ठेवू नये. शिवाय पोळ्यांना सुक्या जागी ठेवावे. ओलसर जागी पोळ्या ठेवल्याने त्या खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो घरात किती माणसे आहेत त्यांना किती पोळ्या लागतात तेवढ्याच काराव्यात. 

भाताच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जरी भात योग्यरीत्या शिजवलेला असेल तरी त्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की भात खाण्यापूर्वी तो योग्यरीत्या शिजवणे गरजेचे असते. शिजवलेला भात दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवता येणे शक्य आहे. 

शिजवलेल्या भाज्या फ्रीजमध्ये तुम्ही तीन दिवस ठेवू शकता. जर तुम्ही भाजी पाच दिवसांपर्यंत ठेवली तर ती खराब होण्याची शक्यता असते. शिवाय त्याला वास येतो आणि चवही बदलते. पावसाळ्याच्या दिवसांत अशा भाज्या खाऊ नये, तर ज्या भाज्यांमध्ये कांदा किंवा पनीर असतो त्या भाज्या तातडीने संपवाव्या. 

उरलेले चिकन किंवा मांस दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. शिवाय हे बनवताना योग्य पद्धतीने तयार करणे फार गरजेचे आहे. मांस किंवा चिकन पुन्हा खाताना ते गरम करून खावे. दही, दूध किंवा क्रीम या पदार्थांचं पॅकिंग एकदा उघडल्यानंतर पुन्ही नीट बंद करून तातडीने फ्रीजमध्ये ठेवावं. 

चिजसारखे पदार्थ एक महिन्यापर्यंत राहू शकतात. पण क्रीम किंवा दूध पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. अर्थात फ्रीज आहे म्हणून कितीही दिवस त्यांना अन्न ठेवले तरी चालते असा गैरसमज कृपा करून घेऊ नका.

सध्या तर जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे. अशावेळी ताजे गरम अन्नपदार्थ खाणेच उत्तम असते असे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या शिळे अन्न खाऊच नका. पण एकाद्या वेळी जास्त अन्न शिल्लक राहिले तर ते फ्रीजमध्ये फार काळ ठेवत बसू नका. खराब अन्न थेट फेकून द्या. कारण त्यामुळे शरीराचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जात होण्याचा धोका असतो.
Powered By Sangraha 9.0