सत्यजित रे : ऑस्कर मिळवणारे एकमेव दिग्दर्शक

Sandyanand    25-May-2020
Total Views |

satyajeet ray_1 &nbs


सत्यजीत रे हे ऑस्कर पुरस्कार विजेते, भारतीय लेखक, पटकथा लेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भरतीय दिग्दर्शक आहेत. ते स्वत:च चित्रपटांना संगीत देत असत, पटकथा लेखन व दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत. यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. 

फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यासहित यांना ऐकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सत्यजित राय यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर राय, प्रसिद्ध लेखक, संगीतकार आणि चित्रकार होते. सत्यजित रायांचे वडील सुकुमार राय कवी, लेखक आणि चित्रकार होते. सत्यजित यांनी पदवी नंतर शांतिनिकेतन येथे पाच वर्षे शिक्षण घेतले व नंतर ते कोलकात्यात परतले व त्यांनी ब्रिटीश जाहिरात कंपनीमध्ये नोकरी पत्करली. पाथेर पांचाली ही कादंबरी त्यांच्या वाचनात आली आणि या कथेचा राय यांच्या मानवर प्रभाव पडला. इ.स. १९४७ मध्ये राय यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली.

ते नियतकालिकांमधून चित्रपट संदर्भातील लेख लिहित असत. कंपनीतर्फे त्यांना इंग्लड येथे पाठवण्यात आले, तेथील सहा महिन्यांच्या वास्तवात त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे बघितले. त्यातून त्यांना स्वत:च सिनेमा काढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी पाथेर पांचाली यावर चित्रपट काढण्याचा विचार पक्का केला अनेक अडचणींचा सामना करत, हा चित्रपट पुर्ण केला. न्युयॉर्क येथील म्युझियम ऑफ मॉडन आर्ट येथे झाले. चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली. पाथेर पांचालीला राष्ट्रीय सुवर्ण पदक आणि राष्ट्रपती रजत पदक याचबरोबर इतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी पुढे एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढले. चित्रपटांसाठी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे रे यांचा २३ एप्रिल १९९२ मध्ये कोलकाता येथे मृत्यू झाला.