जेम्स कॅमेरून यांची अवतार २ ही आतापर्यंतची सर्वांत महागडी फिल्म ठरण्याची शक्यता आहे. या फिल्मचे बजेट सुमारे ७५०० कोटी रुपये आहे.२०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. अवतारचे यापुढील काळात आणखी भागही प्रदर्शित होणार आहेत. त्याच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी वेळापत्रक पाळले जाईल. याची खात्री देता येत नाही, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. न्यूझीलँडमध्ये राहिलेले शूटिंग सुरु होणार आहे. कारण तेथील साथ आटोक्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे शुटींगचे नियोजित दिवस वाया गेले आहेत. यामुळे आता खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.