नव्या सूनबाई विरुद्ध सासूबाइ

    13-May-2020   
Total Views |

Ajoba_1  H x W:
आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी 'माझे तुमचे' या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.


मोकाशी म्हणजे, 'माझी सून कपडे स्वच्छ, पांढरे धुते. आजीबार्ईंना म्हणजे माझ्या पत्नीला कपडे अधिक स्वच्छ, अधिक पांढरे हवे असतात. सासू सुनेला तसे सांगते.' परब म्हणाले, 'नोकरीवरून संध्याकाळी परतल्यावर माझी सून साबणाने हात धुते; पण सासू तिच्यावर सिल्व्हरयुक्त साबणाने हात धुवावेत. हे शब्द उधळते.' शेवटी आम्ही आजोबा अंतिम निर्णयाला आलो. नगरेसवक म्हणजे बोलणाऱ्या सासवा आहेत, तुकाराम मुंढे हे करणारी सून आहे. आम्ही आजोबा काही कामाचे नाही म्हणून आज्यांनी आम्हाला हिशेबातून वगळले सुनांमार्फत त्या कामे करवून घेतात. नगरसेवकांनी तोंडे चालवावीत, सभा घ्याव्यात, मोर्चे काढावेत, पुढील निवडणुकींची तयारी करावी, नवी नवी आश्वासने द्यावीत; पण काम करणाऱ्या प्रामाणिक सुनेला हटवण्याची चूक करू नये. नवी सून आणली व प्रामाणिक, कर्तबगार नसली आणि आम्हा आजोबांप्रमाणे निरूपयोगी असली तर नगरसेवकांची स्वप्ने प्रत्यक्षात कोण उतरवणार?


दसरा आला आणि गेला

दसरा आला आणि गेला. मोरूच्या आजोबांनी तोंडातून उपदेशाचा एक शब्दही उच्चरला नाही. वरती ते देवासमोर मोर्चेकऱ्याप्रमाणे बैठक मारून होते. मोरूला दसरा हा दसरा वाटलाच नाही! न राहवून त्यानं आजोबांना विचारलं, 'आजोबा, माझं काय चुकलं?' तुम्ही मला दसऱ्याच्या दिवशी, 'मोरू, ऊठ आज दसरा' वगैरे म्हणला नाहीत. एरवी तुम्ही घरातल्या घरात काठीच्या आधारनं शतपावली करता; आज तीही नाही. वर तुम्ही देवासमोर बैठक मांडली आहे. का?' 

आजोबा म्हणाले, 'मोरू, मीच नाही तर घरोघरीचे सर्व आजोबा ठरवून, तोंड मिटून, देवासमोर बसले आहेत. काल बागेत आमचे तसे ठरले आहे. खरं तर आम्ही मूक मोर्चाच काढणार होतो; पण आम्हा आजोबांचे गुडघे दुखतात, चालताना तोल जातो. आम्ही मोर्चात काय चालणार रे? आम्ही घरीच देवासमोर मूक बैठक मांडून आहोत!' मोरू म्हणाला, 'आजोबा, तुम्ही काही बोललाच नाहीत, तर तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचणार कसं? 'एक आजोबा, हजार आजोबा' असा फलक हातात धरून तुम्ही २५ आजोबांनी रस्त्यावरून मूक मोर्चा काढला तर कोणाचं नाहीत तरी कमीत कमी चॅनेलवाल्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल, ते ब्रेकिंग न्यूज देतील! असो. तुम्ही मला सांगा. मी १०० मोरूंपर्यंत तुमचं म्हणणं पोचवेन.' 'मोरू, मी बोलतोय, हे बोलणं तुझ्या आजोबांचे तुमझ्यासाठी आहे, असा गैरसमज करून, लगेच आत्महत्या करायला धावू नकोस. माझं हे बोलणं आजोबांच्या संघटनेचं आहे आणि ते सर्व मोरूंकरता आहे.' 'बोला, आजोबा, बोला.' 'मोरू परीक्षा जवळ आली की, अभ्यास करा, टीव्हीसमोरून उठा, राजकीय पक्षांची साठमारी आम्ही पाहतो,' असं सर्वच आजोबा आपल्या नातवंडांना सांगतात. एक वेळ तुम्ही टीव्हीसमोरून उठू नका; पण तुम्ही उठता आणि थेट आत्महत्या करता किंवा घर सोडून पळून जाता. त्यामुळे घाबरून जाऊन आम्ही आजोबा बोलतच नाही रे. 

तुम्ही कानाला फोन चिकटवून, बोलत, लोकलचे रूळ ओलंडता, धावणाऱ्या लोकलखाली सापडता आणि जगातून उठता. फोनचा निरर्थक वापर टाळा हे आम्हा आजोबांना सांगायचं आहे; पण आजोबांना तुम्हा नातवंडांचा धाक वाटतोआणि सेल्फी काढण हे नवं खूळ काय आहे? 
- भा. ल. महाबळ 
फोन : ०२२-२१६३१९४० 
(क्रमश:)