घराच्या किंवा वास्तूच्या भोवताली असणारे रस्ते वाकडेतिकडे असतील तर यामुळे अशुभ फळ मिळते. प्लॉटला जाण्यासाठी रस्ताच नसेल, तर अशा जागी बांधलेली वास्तू अडथळा निर्माण करते.
वास्तूच्या पूर्व दिशेला लागून रस्ता असेल तर झपाट्याने प्रगती होते. संपत्तीत वाढ होते, प्रसिद्धी मिळते. पूर्वेचा रस्ता म्हणजे नेहमी यशाकडे जाणारा रस्ता असतो. पूर्व आणि उत्तर अशा दोन्ही दिशेला रस्ता असेल तर ते लाभदायक असतात. पूर्व आणि पश्चिमेला असणारा रस्ता मध्यम असतो. जीवनात तो सतत यश आणि अपयश दाखवतो. पूर्व आणि दक्षिणेला असलेला रस्ता असेल तर आयुष्य मजेत असतं. त्या घरातली व्यक्ती सुखवस्तू असते.
पश्चिमेला रस्ता असेल तर एका ठरावीक काळापर्यंत भरपूर भरभराट होईल. नंतर मात्र कमतरता भासेल. पश्चिम व उत्तरेला रस्ता असेल तर मध्यम स्वरूपाचं फळ मिळतं. म्हणजे जेवढं मिळतं तेवढा खर्चही होतो. पश्चिम आणि दक्षिणेकडे रस्ता असेल तर त्रासदायक घटना घडतात. आजारपण, आर्थिक चिंता या गोष्टी निर्माण होतात. अशा वास्तूत दक्षिणेकडे दरवाजा नसावा.
उत्तर आणि दक्षिणेकडे रस्ता असेल तर दक्षिणेकडील रस्त्याचा वापर करू नये. उत्तरेकडील रस्त्याचा वापर करावा. फक्त उत्तरेकडे एकच रस्ता असेल तर भरभराट होते. अशा वास्तूत काहीही कमी पडत नाही. याचे मुख्यद्वार उत्तरेकडेच काढावे. वास्तूच्या तीन बाजूस असणारे रस्ते त्रासदायक नसतात. संमिश्र किंवा चांगली फळे देणारे ठरतात. वास्तूच्या चारही बाजूंनी रस्ता असेल तर चांगले असते. सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये भरभराट होते. कधीच कशाला कमी पडत नाही.
वाईट परिणाम करणारे रस्ते : घराच्या किंवा वास्तूच्या भोवताली असणारे रस्ते वाकडेतिकडे असतील तर यामुळे अशुभ फळ मिळते. प्लॉटला जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा जागी बांधलेली वास्तू अडथळा निर्माण करते. सर्व मार्ग बंद करते. या सर्व दिशांपैकी कोणताही एक रस्ता वास्तूजवळ येऊन थांबत असेल तर ते नुकसानकारक असते म्हणजे कोणताही रस्ता जर घराच्या दारावर येऊन थांबत असेल तर संकटाने आपल्या दारावर दस्तक देण्यासारखे असते.