अनुष्ठानांवेळी पत्नी पतीच्या डावीकडेच का बसते?

09 Apr 2020 12:15:35
 
 
हिंदू धर्मानुसार पूजा-पाठ, धार्मिक अनुष्ठाने व मंगल काङ्र्मामध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसून सर्व प्रकारचे धार्मिक विधी पार पाडण्याची प्रथा पाळली जाते.
 
शास्त्रांमध्ये पत्नीला वामांगी म्हटले जाते. याचा अर्थ डाव्या अंगाची अधिकारी असा होतो. अशी मान्यता आहे की, भगवान शिवशंकरांच्या डाव्या अंगाद्वारे स्त्रीची निर्मिती झाली आहे. शिवाचे अर्धनारीश्वर स्वरूप हे त्याचेच प्रतीक आहे.
 
शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की, स्त्री ही पुरुषाची वामांगी असल्याने झोपतेवेळी, सभेमध्ये, सिंदुरदानाचे वेळी, आशीर्वाद ग्रहण करते समयी व भोजन समयी स्त्रीने पतीच्या डाव्या बाजूलाच असले पाहिजे. त्यामुळे शुभ फलाची प्राप्ती होते. परंतु वामांगी असूनही काही विशिष्ट काङ्र्मांमध्ये मात्र स्त्रीने उजवीकडे राहावे असे शास्त्रवचन आहे.
 
शास्त्रांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कन्यादान, विवाह, यज्ञकर्म, जातकर्म, नामकरण व मुलाचा अन्नप्राशन संस्कार या प्रसंगी स्त्रीने पतीच्या उजव्या बाजूलाच बसावे. पत्नीने पतीच्या उजव्या वा डाव्या बाजूस बसण्यासंबंधी या मान्यतेचा तर्क असाही आहे की, जी कर्मे सांसारिक असतात, त्या कर्माच्या वेळी पत्नीने पतीच्या डावीकडे बसावे.
 
कारण ही कर्मे स्त्रीप्रधान कर्मे मानली जातात. परंतु यज्ञ, कन्यादान, विवाह ही सर्व कामे मात्र पारलौकिक मानली गेली आहेत. आणि ही सर्व कामे पुरुषप्रधान मानली गेली आहेत. म्हणूनच या कर्मांमध्ये पत्नीने पतीच्या उजवीकडे बसावे, असे शास्त्रवचन आहे.
 
Powered By Sangraha 9.0