संतांचे विचार पोहचविणारी महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा

06 Apr 2020 15:59:14
 
 
 
 
महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांच्या कार्याचा फार मोठा वाटा आहे. वारकरी संतांनी आपल्या साहित्यातून समतेच्या विचारांची पेरणी महाराष्ट्रात केली. म्हणूनच ज्या ज्या सुधारणावादी चळवळी महाराष्ट्रात निर्माण झाल्या त्यांच्या मुळाशी वारकरी संतांच्या विचारांचा ओलावा आहे. जेव्हा प्रबोधनाची आणि लोकजागृतीची कोणतीही साधने नव्हती तेव्हा गावागावात संतांचे विचार पोहोचविण्याचे काम कीर्तनकारांनी केले.
 
नारदीय कीर्तन : नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन आणि गुरुदेव संप्रदाय मंडळांचे कीर्तन. यात नारदीय कीर्तन परंपरा ही सर्वांत जुनी कीर्तन परंपरा म्हणून ओळखली जाते. संत नामदेव, ज्ञानेश्वरांच्या अगोदर ही कीर्तन परंपरा अस्तित्वात होती. परंतु संत नामदेवाने वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली.
 
वारकरी कीर्तन : वारकरी कीर्तनास निरूपण अशी संज्ञा आहे. संत नामदेव हे या परंपरेचे आद्य कीर्तनकार आहेत. वारकरी कीर्तनात ज्ञानोबा ते निळोबा यांचे वायय येते. या परंपरेत समर्थ रामदास वज्र्य आहेत. कीर्तनाचा आरंभ जय जय रामकृष्ण हरीने होतो. रूप पाहता लोचनी व सुंदर ते ध्यान हे नमनाचे अभंग म्हणतात.नंतर जय जय विठोबा रखुमाईचा सामूहिक गजर होतो. तुकोबांच्या काळात पूर्वरंग व उत्तररंग असे कीर्तनाचे दोन भाग झाले. गाडगे महाराजांची वारकरी कीर्तनपद्धती वेगळी आहे. देवकीनंदन गोपाला हा त्यांचा मूलमंत्र आहे. वारकरी कीर्तनात श्रोता-वक्ता संवाद यात अधिक आहे.
 
राष्ट्रीय कीर्तन : हा नारदीय कीर्तनपरंपरेतला उपप्रकार आहे. लोकमान्य टिळकांनी याचा उपयोग नीट जाणला. जनसामान्यांच्या मनात कीर्तनातून केसरी रुजावा म्हणून टिळकांनी राष्ट्रीय कीर्तन राबविले. राष्ट्रीय कीर्तन ही नवी संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. याचे आद्य जनक डॉ. दत्तात्रेय विनायक पटवर्धनबुवा (वाई) हे होत. ते लोकमान्यांचे अनुयायी होते. पूर्वरंग निरूपणासाठी घेतलेला अभंग व आख्यान यांची नेमकी सांगड त्यांनी घातली.
 
Powered By Sangraha 9.0