ॐ चा उद्भव नाही तसा अंत सुद्धा नाही. ॐ अविनाशी आहे. तेच ब्रह्मांड आहे. ॐ हीच श्नती आणि भ्नतीचे रूप आहे. कोणत्याही देवतेच्या मंत्राची सुरुवात ॐ द्बारेच होते. सर्वच धर्मामध्ये ॐ चे त्यांच्या संस्कृतीनुसार उच्चारण होते.ॐ एक असा शब्द आहे, जो सर्वव्यापी आहे. ॐ च्या मूळ उच्चाराचा अपभ्रंश करून जगातील सर्वच धर्मात ॐ विद्यमान आहे. कारण ते कल्याणमय भावनेचे प्रतीक आहे. आज भारतीय 'राम, तुझी माया' म्हणतात. हा स्थानिक शब्द आहे. पण ॐ सर्वव्यापी शब्द आहे. सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी सुद्धा हा प्राणस्वरूप प्रणवमंत्र ॐ होता. सृष्टीचा प्रलय झाल्यावरही ॐ कायमच राहतो व पुढेही राहणारच आहे. हे मानण्याची ४ कारणे आहेत. ज्यावेळी सृष्टीची रचना झाली त्यावेळी पृथ्वीचे पंच तत्व पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश मिळून हे वातावरण, सृष्टी तयार झाली. त्यामुळेच पृथ्वीवर लोक या पंचतत्वाला ईश्वर मानून पूजा करतात, आराधना करतात. या ५ तत्वांची आपल्या शरीरात अनुभूती होते.
आपण बोलताना जो ध्वनी निघतो कानाने ऐकतो हा आकाशतवांचा गुणधर्म आहे. त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची अनुभूती होते ती वायुतत्त्वामुळे. आपण डोळ्यांनी पाहतो ती अग्नी तत्त्वाची परिणती आहे. शरीरात किंवा जीभेवर जे रस तयार होतो तो जल म्हणजे पाण्याचा गुणधर्म आहे. सुगंध ही पृथ्वीतत्त्वाची अनुभूती आहे. संपूर्ण जगातील प्राणिमात्रांचे जीवनचक्र पाच ज्ञानेंद्रियांच्या आधारावरच चालते. आपले शरीर या पंचतत्त्वाद्बारेच बनले आहे व ही पाच इंद्रिय निष्क्रिय झाल्यावर माणसाचा मृत्यू होतो. सृष्टीचा नाश झाला तर पृथ्वीचाही नाश होतो.
इतर चार तत्त्व सुद्धा नष्ट होतात. पण ध्वनी मात्र अमर आहे, कारण आकाशाच्या विशाल गर्भात ध्वनी टिकून राहतो. ध्वनीचा कधीच नाश होत नाही, हा ध्वनी म्हणजेच ॐ आहे. ऋषि मुनींनी उच्चारलेला पहिला शब्द ॐ हाच होता. या ॐ मुळेच पंचतत्त्वाची पुन्हा निर्मिती होते. म्हणजेच ॐ सार्वकालिक आहे, सर्वशक्तीमान आहे. ॐ चा उच्चार केवळ धार्मिक नव्हे तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही लाभदायक आहे. नास्तिकांनी ॐ चा उच्चार चुकून केला तरी त्यांचाही फायदा होतो. ॐ सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. प्रत्येक धर्म, संप्रदाय किंवा सृष्टीने या ॐ रूपी ईश्वराची मनोभावे आराधना केल्यास जगात शांतता नांदेल व ते नंदनवन होईल. असा आहे ॐ चा महिमा.