नाकातून रक्त येण्याला घोळणा फुटणे असं म्हणतात. कधी कधी नाकातून रक्त येण्याआधी चेहरा लाल होतो. डोकं दुखतं. नाकातून रक्त वाहू लागलं की, चेहरा पूर्ववत होतो. हा आजार उन्हाळ्याच्या दिवसात जास्त होतो.
कारण नाकातून रक्त येण्याचं कारण खूप वेळ उन्हात रहाणं. मुलं जास्त वेळ उन्हात खेळण्यामुळे किंवा जास्त धावपळ करण्यामुळे शरीरातील उष्णता मेंदूत जाते. ज्यामुळे नाकातून रक्त वाहू लागतं. नाकाला जखम झाल्यामुळे नाकाच्या आतील श्लैष्मिक फाटते. नाकातून रक्त वाहतं. काही जण खूप उष्ण पदार्थही खातात. ज्यामुळे नाकातून रक्त येते. काही जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, ज्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येते. अनेकदा मुलींची मासिक पाळी बंद झाल्यानंतर नाकातून रक्त येते. लक्षणं नाकातून रक्त येण्याच्या आजारात डोकं दुखतं आणि चक्कर येते. यामुळे नाकातून रक्त येते. कधी कधी एकाच नाकपुडीतून रक्त येतं. कधी कधी रक्त आवाजाच्या नलिकेत जातो. ज्यामुळे खोकला येतो. रूग्णाला अस्वस्थपणा जाणवतो. भोजन आणि पथ्यं नाकातून रक्त येण्याच्या समस्येत रूग्णानी जास्त वेळ उन्हात थांबू नये. आगीजवळही बसता कामा नये. आहारात थंड पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा. आहारात गरम पदार्थ आणि तीव्र मसाले यांचा समावेश करता कामा नये. या आजारात उष्णतेला नाहिसं करणारे सर्व उपाय करायला हवेत.