हळद : अनेक विकारांमध्ये अत्यंत गुणकारी औषध

22 Apr 2020 11:58:24



खरंतर प्रत्येक घरात एक स्वयंपाकघर असतं, जिथे हळद, धणे, हिंग, काळे मिरे असे सगळे मसाले असतात. कोणतीही भाजी या मसाल्यांखेरीज पूर्ण होत नाही. हे मसाले केवळ स्वाद वाढवतात असं नव्हे तर अनेक प्रकारे उपयुक्त ठरतात. हळदीचा वापर केवळ अन्नपदार्थात केला जातो, असं नव्हे तर अनेक घरगुती उपायांमध्ये ती फायदेशीर ठरते.

संस्कृतमध्ये हळदीला क्रिधना असंही म्हणतात, म्हणजे किटाणूनाशक.

मुरूम : चेहऱ्याची त्वचा मुरूम आणि डागांनी कुरूप होते. अशावेळेस हळद एक चमचा, दोन चमचे बेसन, संत्र्याच्या सालची पावडर एक चमचा, दुधाची साय अर्धा चमचा आणि थोडं पाणी मिसळून लेप तयार करावा. हा लेप चेहऱ्यावर लावावा. दहा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. नियमितपणे हा उपाय करण्याने चेहऱ्यावर डाग, मुरूम नाहिसे होतात.

जखम आणि सूज : शरीराला दुखापत झाल्यास सूज येते. हळदीत थोडा ओला चुना मिसळून त्याचा लेप त्या ठिकाणी लावावा. अशाप्रकारे एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद आणि दहा ग्रॅम गूळ मिसळून प्या. या दोन्ही उपायांनी दुखापत किंवा वेदना दूर होण्यास मदत होईल.

घशाची खवखव : घशामध्ये खवखव, टॉन्सिल्सला सूज आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्या किंवा एक कप गरम दूध प्या, पण गार पाणी पिऊ नका.

हिरड्या खराब होणे : अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ आणि ४-५ थेंब सरसोचं तेल मिसळून हिरड्यांवर त्याचा लेप लावावा. यामुळे दात आणि हिरड्या कधी दुखत नाहीत.

नेत्र दोषात : डोळ्यांच्या दोषात एक चमचा हळद दोन कप पाणी घालून उकळून घ्या. अर्ध पाणी राहिपर्यंत उकळू द्या. त्यानंतर हे मिश्रण कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या. ड्रॉपरने दोन थेंब डोळ्यात टाकण्याने नेत्र दोष दूर होतात.

दमा : दम्याचा अ‍ॅटॅक आल्यानंतर पाच ग्रॅम हळद पाव लिटर पाण्यात मिसळून पिण्याने फायदा होतो.

वाहणारे रक्त रोखते : काही लागल्यानंतर जर रक्त वाहत असेल तर रक्त थांबविण्यासाठी थोडी हळद घालावी, रक्त थांबतं.

पोटदुखी : दही किंवा ताकात हळद मिसळून पिण्याने पोटदुखी नाहिशी होते. दही किंवा ताक पोटाला साफ करते. तर हळद पचन क्रिया ठिक करते.

मधुमेह : बारा ग्रॅम मधात तीन ग्रॅम हळद मिसळून थोडं चाटण्याने फायदा होतो. हा उपाय तीन महिने करा त्याचबरोबर दोन कारल्याचा रसही प्या. आजार दूर होण्यास मदत होईल.

कानात पू : हळदीत शुद्ध सरसोचं तेल मिसळून गरम करून बाटलीत भरून ठेवा. दिवसातून दोन-तीन वेळा कानात घाला. हा उपाय पंधरा दिवस करण्याने फायदा दिसेल.

उचकी लागत असेल तर : पाच ग्रॅम हळद आणि पाच ग्रॅम उडीद डाळ मिसळून वाटून घ्या हे मिश्रण थोडं गरम करून त्याचा वास घेण्याने उचक्या लागणं बंद होईल.

विषारी किडा चावल्यास : हळद वाटून, त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून याचा लेप चावलेल्या ठिकाणी लावल्यास विषाचा प्रभाव कमी होतो.

काविळीमध्ये : हळद तीन ग्रॅम घ्या, ती अर्धा लिटर ताकात मिसळून तिचं सेवन करा. तसंच गरम पाण्याने आंघोळ करू नका. गरम मसालेही खाऊ नका. दोन ग्रॅम हळद पंचवीस ग्रॅम गायीच्या तुपात मिसळून सकाळी अनोशा पोटी खाण्याने फायदा होतो.
Powered By Sangraha 9.0