व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी इतरांची मदत लागते

02 Apr 2020 17:26:37
 
 
 
 
 
आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तसेच सुधारणेसाठी इतरांच्या मदतीची आवश्यकता असते हे लक्षात ठेवावे. माणुसघाणी व कुढ्या प्रवृत्तीची व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधू शकत नाही. इतरांच्या सहवासात राहून समाजातील आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. 
 
आपण योग्य ते कपडे परीधान केले तर आपले व्यक्तिमत्व उठून दिसते. शरीर स्वच्छ ठेवणे, योग्य केशरचना करणे, नीटनेटके कपडे वापरणे हे प्रत्येकाच्या स्वाधीनचे आहे. या गोष्टीमुळे व्यक्तिमत्व उठून दिसते.व्यक्तिमत्व ही निसर्गाची देणगी आहे. प्रत्येक सजीव प्राण्याला व्यक्तिमत्व असते. कुत्र्या-मांजरालाही व्यक्तिमत्व आहे पण त्यांच्या बाबतीत व्यक्तिमत्व हा शब्द वापरता येत नाही. गोरा रंग, सुडौल बांधा, धिप्पाड शरीरयष्टी, आकर्षक-प्रसन्न चेहरा असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुरेख आहे असे आपण सामान्यपणे म्हणतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने बाह्य दर्शानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवणे चूक होय.
 
 
 
व्यक्तिमत्व म्हणजे वेगळे अस्तित्व असलेली व्यक्ती. प्रत्येकास जन्मतः व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यावर व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्वात रुपांतर होते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे व्य्नतीची शारीरिक ठेवण, बुद्धी, चारित्र्य, कर्तृत्व, गुण आदींचा समावेश त्यात होतो. व्यक्तीचा शारीरिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे तिचे व्यक्तिमत्व. शरीराचा रंग व ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टी घेऊन व्यक्ती जन्माला येते. या गोष्टी तिला आनुवंशिकतेने मिळालेल्या असतात. व्यक्तीकडे असलेल्या उपजत अशा बाबींना जैविक बीजे म्हणता येईल. 
जीवन जगत असतांना विविध बाह्य घटकांचा, प्रामुख्याने सामाजिक घटकांचा, व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत असतो. जैविक बीजे व बाह्य घटक यांच्यातील आंतरक्रियेचा परिपाक म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व होय. नेहमी हसतमुख असणारी व गोड बोलणारी व्यक्ती आपल्याला आवडते. सदासर्वदा कपाळावर आठ्या असलेल्या, दुर्मुखलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडत नाही. आपली वृत्ती आनंदी ठेवणे व गोड बोलणे फार कठीण नाही. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तसेच सुधारणेसाठी इतरांच्या मदतीची आवश्यकता असते हे लक्षात ठेवावे. माणुसघाणी व कुढ्या प्रवृत्तीची व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मूल्य असते. इतरांचा आपल्यावर परिणाम होतो तसा आपला इतरांवर परिणाम होत असतो. इतरांच्या सहवासात राहून समाजातील आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.
 
 
Powered By Sangraha 9.0