जगभरात आहेत बेडकांच्या ५०० प्रजाती, प्रत्येक प्रजातीचे वेगळे वैशिष्ट्य

02 Apr 2020 17:13:10
 
 

 
 
 
 
जागतिक तापमानवाढीमुळे बेडकांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. ज्या परिसरात बेडकांची संख्या अधिक असते ते पर्यावरण निरोगी असते, असे काही वैज्ञानिकांचे मत आहे.
हा चतुष्पाद प्राणी उभयचर वर्गातील (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील) सलाएन्शिया किंवा न्यूरा या गणात आढळतो. या गणातील रॅनिडी या कुलात आढळणारे उभयचर खरे बेडूक होत; पण इतर काही कुलांतील उभयचरांसही सर्वसाधारणपणे बेडूक असेच संबोधितात. या वर्गात सॅलॅमँडर, न्यूट, सिसिलियन व मॅक यांचाही समावेश आहे. रॅनिडी या कुलात सु. ३० वंशांचे आणि ५०० जातींचे बेडूक आहेत. यांचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. यांपैकी एकट्या राना या वंशातच २०० जाती आहेत. रॅनिडी कुलातील फ्नत राना हाच वंश उत्तर अमेरिकेत आढळतो.
 
 
 
बेडकांच्या पुष्कळशा जातींचा रंग पिंगट हिरवा किंवा तपकिरी असतो. काही जातींचे रंग भडक असतात, तर काही जाती आपले रंग बदलू शकतात. बेडकांची त्वचा मऊ व ओलसर असते. काही बेडकांच्या पाठीवरील त्वचेत विषारी ग्रंथी असतात. बेडकांचे पाय लांब असतात व त्यामुळे त्यांना पोहण्यास व लांब उड्या मारण्यास मदत होते. काही आफ्रिकन बेडूक २.४ मी. लांब उडी मारू शकतात. काही बेडकांच्या पायात बोटांमध्ये कातडे असते. यामुळे त्यांना पोहणे सुलभ होते. 
जास्त वेळ जमिनीवर राहणारे बेडूक वरून भेकाप्रमाणे दिसतात. त्यांच्या बोटावर एक गाठ असते. तिच्यामुळे त्यांना जमीन खणणे सुलभ जाते. काहींच्या बोटांची टोके चकतीसारखी असतात. त्यांचा उपयोग झाडावर चढण्यासाठी होतो. पूर्ण वाढ झालेल्या बेडकाची लांबी काही जातींत २.५ सेंमी.पेक्षा कमी असते, तर काहींत ती २५ सेंमी.पर्यंत असते. रा. गोलियाथ हा पश्चिम आफ्रिकेतील बेडूक सर्वांत मोठा गणला जातो. याची लांबी २५ सेंमी. असते. सर्व बेडकांत मादी ही नरापेक्षा आकारमानाने मोठी असते.
प्राणिविज्ञानात शरीररचना अभ्यासण्यासाठी बेडकाचे विच्छेदन केले जात असे. जैविक कीड नियंत्रणात बेडूक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्याचे विच्छेदन थांबविण्यात आले आहे. मानवासाठी बेडूक अनेक दृष्ट्या उपयु्क्त ठरला आहे. तो कीटकभक्षी असल्याने उपद्रवी कीटकांची संख्या आटोक्यात राहते. नव्या औषधांची चाचणी घेण्यासाठी वैद्यकशास्त्रात त्यांचा वापर करतात. मात्र प्रदूषण, अधिवास क्षेत्राचा èहास, आम्लवर्षा इ. कारणांनी बेडकांच्या संख्येत घट झाल्याचे १९८० नंतर झालेल्या संशोधनांतून आढळून आले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0