शनिवार विषयी अनेक रंजक गोष्टी आहेत. शनिवारबाबत जगभर वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात.
शनिवार म्हणजे केवळ वीकेंडचे आगमन आणि एन्जॉयमेन्टचे प्लॅन्स यापुरते मर्यादित नाही. यशस्वी व्यावसायिक आठवड्याचे सहा दिवसच नव्हे तर सातही दिवस काम करत असतात. किमान अनेक मुलाखतींमध्ये तरी ते तसे सांगत असतात. पोटात गोळा आणणाऱ्या सोमवारच्या तुलनेत सुट्टीचा आनंद घेऊन येणारा शनिवार हवाहवासा वाटतो.
परंतु ऐतिहासिक आणि दंतकथांच्या दृष्टीने शनिवार विषयी अनेक रंजक गोष्टी आढळतात. शनिवारचे नाव हे शनी ग्रहावरून पडले आहे. इंग्रजी भाषेत सॅटर्डे हा शब्द ग्रीक सॅटर्नवरून आला आहे. सॅटर्न ही पिढ्यांची, विसर्जनाची, समृद्धीची, संपत्तीची, शेतीची, नियमित निर्माणाची आणि मुक्तीची देवता मानली जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक वार हा कुठल्या तरी देवतेचा मानला जातो. त्यानुसार शनिवार हा शनीदेवाचा किंवा हनुमानाचा वार मानला जातो. यादिवशी शनीच्या मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागलेल्या दिसतात. शनीच्या भक्तीमुळे आपल्या मागील साडेसाती संपुष्टात येईल, अडचणी दूर होतील, चांगले दिवस येतील असे श्रद्धाळूंना वाटत असते.
पाश्चिमात्य संस्कृतीत शनिवार हा भुतांना मारण्यासाठीचा चांगला दिवस समजला जातो. कारण त्यादिवशी भुते ही शवपेटीत बंदिस्त असतात असा समज आहे. (क्रमश:)