दुष्काळ हा मानवनिर्मित , तो हटविताही येता

19 Apr 2020 13:57:48
 
 
 
हा प्रयोग काही वर्षापूर्वी मी प्रवरा कारखान्याच्या क्षेत्रात केला. त्या कारखान्याचे वैशिष्ठ्य म्हणजे तो महाराष्ट्रातीलμ एका बाजूला रासायनिक खतांचे प्रयोग आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकृषीचे प्रयोग असा तो प्रकल्प होता. (भाग : १००९)
 
दुष्काळ ही माणसाने तयार केलेली समस्या आहे. त्याच प्रमाणे शेतीला पाणीटंचई ही सुद्धा माणसाने तयार केलेली कल्पना आहे. यातून आपण मार्ग काढू शकतो पण त्यासाठी ऋषिकृषीचा अभ्यास करण्याची आणि त्यावर प्रयोग करण्यासाठी पुढे आले पाहिजेत. एकदा आपण दुष्काळ आणि पाणी टंचाई मान्य केली की, धरणे, कालवे व ठिबक सिंचन हे मुद्देही आलेच.
 
ऋषिकृषीपद्धतीने त्याची आवश्यकताच नसते. पण हजारो आणि लाखो कोटी रुपये खर्च करून बांधलेली धरणे याचा काही उपयोग नाही असे म्हटले तर कोणी ऐकून घेण्याच्या स्थितीत असणार नाही. अशावेंळी धरणे, कालवे आणि ठिबक सिंचन यावर टिपणी करण्याऐवजी त्यांचा काही उपयोग न करता धरणाच्या पाणीपुरवठ्यापेक्षाही अधिक पीक आपल्याला घेता आले तर. हा प्रयोग काही वर्षापूर्वी मी प्रवरा कारखान्याच्या क्षेत्रात केला. त्या कारखान्याचे वैशिष्ठ्य म्हणजे तो महाराष्ट्रातील एका बाजूला रासायनिक खतांचे प्रयोग आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकृषीचे प्रयोग असा तो प्रकल्प होता. त्यात मी एका एकरात एकशे वीस टन उस घेवून दाखविला. नव्या पिढीने हे प्रयोग व्यवस्थित वाचावेत. प्रथम ते थोड्या क्षेत्रात करावेत.
 
ते अधिकाधिक क्षेत्रात करायला माझी हरकत नाही. पण त्याची खात्री पटायला पाहिजे. प्रथम पाणी पुरवठ्याचे ऋषिकृषी सूत्र सांगतो. त्यानुसार आपण म्हणतो त्या दुष्काळी क्षेत्रातील जमीनही जर सजीव असेल म्हणजे त्याच्याखाली प्राकृतिक गांडुळांची संख्या आणि अन्य आवश्यक ती जीवसृष्टी असेल तर त्या जमिनीत येण्याच्या क्षमतेचे जे पीक असते त्याला आवश्यक असणारे पाणी ते जीवच तयार करत असतात. त्या जीवजंतू यांच्या मलमूत्राच्या माध्यमातून एका चौरस मीटर क्षेत्रात अर्धा लीटर पाणी आपोआप तयार होत असते. त्यात त्याठिकाणी येणाऱ्या पिकाची वाढ व्यवस्थित होत असते. आता जमिनीला पाणी देणे म्हणजे कृत्रिम पद्धतीने पाणी देणे अशी व्याख्याच होऊन बसली आहे. मी माझ्या आयुष्यात हा विषय अनेकांना सांगितला. पण फार थोड्या जणांनी त्यांचे अनुकरण केले.
 
ज्यांनी त्याचे अनुकरण केले, त्यांच्या शेतीत आमूलाग्र बदल तर झालाच पण त्यांची जीवनेही आमूलाग्र बदलली. त्यांच्या घरातील विषारी असलेल्या रासायनिक खताच्या आधारे येणाऱ्या पिकाच्या धान्याचा म्हणजे विषयुक्त अन्नाचा वापर बंद झाल्यावर माणसांची शरीरप्रकृती बदलली आणि मनेही बदलली. तरुण शेतकऱ्यांनी जर ऋषिकृषीसाठी एक छोटासा कोपरा जरी राखून ठेवला तरी थोड्या दिवसातच तुमच्या जीवनाचा तो भाग होईल.
 
Powered By Sangraha 9.0