कपाळावर असणाऱ्या रेषा आणि त्याची रचना वा बाबी जातकाचे भाग्य वर्णन करीत असतात. कपाळावर जर तीनच स्पष्ट रेषा असतील तर जातकाचे आयुष्य शंभर वर्षापर्यंत असत. जर कपाळावर ४ अखंडित व स्पष्ट रेषा असतील तर जातकाचे आयुष्य ९५ वर्षांचे असते असा जातक भाग्यवानही असतो. ज्या जातकाच्या कपाळावर स्पष्ट दिसणारी एकही रेषा नसेल परंतु ४-५ अस्पष्ट व खंडित रेषा असतील असा जातक विलासप्रिय व व्यभिचारी असतो. त्याला अनैतिक रूचि असते. तो ९० वर्षे जगतो. ज्याच्या कपाळावर एकही स्पष्ट वा अस्पष्ट दोन्ही प्रकारची रेषा नसेल असा जातक भाग्यशाली व यशस्वी बनतो. तो ९० वर्षे जगतो.
जर कपाळावरील रेषा सरळ नसून वाकड्या- तिकड्या असतील तर जातक अल्पायुषी (४० वर्षे जगणारा) असतो. जर डो्नयाची रचना उत्तम असेल, कपाळावरील रेषाही सरळ व ठळक असतील तर असा जातक न्नकीच बुद्धिमान भाग्यवान व महान व्यक्तिमत्वाचा असतो. एखाद्या जातकाच्या डो्नयाची रचना त्याच्या कपाळाची स्थिती व त्यावरील रेषा बघून तो बुद्धिमान आहे की मूर्ख आहे, धनवान आहे की, दरिद्री या बाबींचा अंदाज सहजपणे घेता येतो. मानवी मस्तक हेच मानवाच्या समस्त मानसिक व शारीरिक क्रियांचे संचालक आहे म्हणूनच ललाट रेषा व मस्तकाची रचना या बाबी महत्त्वाच्या ठरतात. काय आहे ललाट रेषांबाबत पाश्चात्य मत? पाश्चात्य विद्वानांनीही मस्तकाच्या रचनेवर आणि ललाटरेषांवर संशोधन करून त्यांचे महत्व मान्य केले आहे. परंतु त्यांनी मस्तकाचे व कपाळाचे मोजमाप घेऊन त्याप्रमाणे फलांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते. २२ ते २४ इंच एवढ्या आकाराचे एकूण लांबीचे मस्तक उत्तम ठरते. २२ इंचापेक्षा एकूण कमी लांबी असेल तर असे मस्तक साधारण ठरते.
स्त्रियांसाठी त्यांनी २० इंचापेक्षा जास्त लांबी असणारे मस्तक चांगले मानले आहे. पाश्चात्य विद्वानांच्या मतानुसार १७ इंचापेक्षा एकूण कमी लांबी असणारे जातक मूर्ख असतात. परंतु भारतीय मतानुसार हनुवटीपासून वर जात जात केस मानेवर जेथे संपतात तेथपङ्र्मंतचे बोटांनी मोजलेले अंतर जर ३२ अंगुळेपेक्षा जास्त व एका कानापासून दुसऱ्या कानापङ्र्मंतचे अंतर जर १८ अंगुळेपेक्षा जास्त असेल तर ते शुभ लक्षण मानावे. भारतीय मतानुसार कपाळावर त्रिशूल चिन्ह असणे वा कपाळावरील रेषा त्रिपुंड चिन्हवजा असणे ही बाब शुभ ठरते. असा जातक भाग्यवान व शतायु असतो. भारतीय मतानुसार कपाळावरील वरची प्रथम रेषा ही शनीची, त्याखालची गुरुची, तिसरी मंगळाची, चौथी सूङ्र्माची आणि तीच रेषा डावीकडची चंद्राची असते. दोन्ही भुवयांना जोडणारी रेषा ही शुक्राची मानली जाते.