गळ्याला गाठ आणि सूज का येते ते जाणून घेऊ

12 Apr 2020 16:11:48


कोणत्याही आजाराच्या बाबतीत सतर्कता खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

काही आजार असे असतात, ज्याविषयी आपण अनभिज्ञ असतो. पण ही अनभिज्ञता आपल्याला चांगलीच महागात पडू शकते. त्यापैकीच एक आजार म्हणजे थायरॉइड ग्रंथीशी संबंधित समस्या. गळ्यातील गाठ आणि सूज याकडे दुर्लक्ष करू नका. ही थायरॉइड किंवा थायरॉइड कॅन्सरशी संबंधित समस्या असू शकते. याविषयी माहिती देणारा हा आलेख...

थायरॉइड ही फुलपाखराच्या आकारातील ग्रंथी आहे. जी मानेच्या समोरच्या भागात स्थित असते. ही थायरॉइड हार्मोनचा स्त्राव करते. जी शरीर आणि मेंदुला सक्रिय ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉइड ग्रंथीच्या बाबतीत सगळ्यात मोठी समस्या ही आहे की, ही माणसासाठी खूप मोठी समस्या निर्माण करू शकते. हायपोथायरॉइडिज्म आणि हायपरथायरॉइडिज्म यांसारख्या स्थितीत शरीरात असणारे थायरॉइड हार्मोन असंतुलित होते. ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसते.

थायरॉइड कर्करोगाची समस्या खूप कमी प्रमाणात आहे. तरीही या धोकादायक समस्येविषयी जागरूकता निर्माण खूप आवश्यक आहे. थायरॉइड कर्करोग ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये थायरॉइड ग्रंथीच्या पेशी अनियमितपणे वाढू लागतात. जर या प्रकारच्या कर्करोगाचा इलाज वेळीच केला नाही तर या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांची बरी होण्याची शक्यता खूप कमी असते. लक्षणांकडे लक्ष द्या काही रूग्णांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाही, पण मानेच्या नियमित परीक्षणादरम्यान डॉक्टरांना यासंबंधी लक्षण म्हणजे मानेत गाठ किंवा सूज दिसते.

बहुतांश रूग्णांमध्ये थायरॉइड कर्करोगाची लक्षणं कधी कधी गळ्याचा संसर्ग, पोटाच्या समस्या किंवा श्वसनाची अ‍ॅलर्जी अशी दिसतात. जर याविषयी वेळीच समजले तर यावर उपचार करणं शक्य होतं. थायरॉइड कर्करोगाची लक्षणं याचं सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे मानेमध्ये गाठ किंवा सूज येणं, जी निदानानंतर पूर्णपणे बरी होते. गिळण्यास समस्या, श्वास घेण्यास समस्या, नियमितपणे घशामध्ये घरघर होणे सतत आणि सातत्याने खोकला येणे, ज्याचा संबंध थंडीशी अजिबात नसतो. काही लोकांच्या कानात वेदना होतात.

काही लोकांना कर्कशता किंवा गळा बसणे अशाप्रकारच्या समस्या जाणवतात. जोखीमेची कारणं थायरॉइड कर्करोग होण्यामागे अनेक कारणं जबाबदार ठरतात. यामध्ये काही कौटुंबिक इतिहास, जीन्स, धूम्रपान, आयोडिनची कमतरता, लहानपणी एक्सरेच्या संपर्कात येणे ही काही कारणं आहेत. काही कारणांवर नियंत्रण मिळवू शकतो किंवा त्यांना नाहिसं करता येतं. तर काही कारणांमध्ये सुधारणा करता येते. पण ही खूप चिंतेची गोष्ट नाही, कारण थायरॉइडने ग्रस्त खूप कमी लोकांमध्ये थायरॉइड्अ कर्करोगाची शक्यता कमी असते. जोखिमेची कारकं जाणून घेऊन आपण या आजाराविषयी आणि त्याच्या लक्षणांविषयी सतर्क राहू शकतो.

काय आहेत उपचार?

माणसाच्या शरीरातून संपूर्ण थायरॉइड ग्रंथी किंवा तिचा काही भाग काढून टाकला जातो. त्याच्यानुसार इलाज केला जातो. त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य सुरळीत जावं याकरता कृत्रिम थायरॉइड हार्मोन घ्यावा लागतो. थायरॉइड कर्करोगाचा उपचार रेडिओधर्मी आयोडिनच्या माध्यमातून केला जातो आणि बहुतांश केसेसमध्ये किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी यांचा उपयोग केला जात नाही. रूग्णामध्ये या प्रकारचा कर्करोग परत होऊ नये यासाठी त्यासाठी सावधान असणं खूप आवश्यक आहे. या उपचारांनंतर रूग्णाची नियमित तपासणी खूप आवश्यक ठरते.
Powered By Sangraha 9.0