भिंतीवरील घड्याळ कोणत्या दिशेला असावे?

11 Apr 2020 12:16:52



भिंतीवरील आकर्षक घड्याळाचा शो पीस म्हणून वापर केला जात असतो. भिंतीवरील घड्याळाची जागा सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून निश्चित न करता वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ठरवल्यास त्यापासून उदंड शुभफळे मिळतात. घड्याळ उत्तरेकडील वा पूर्वेकडील भिंतीवर लावणे कटाक्षाने टाळावे. पूर्वेच्या भिंतीवरील घड्याळ प्रगतीच्या मार्गात अडथळे आणते, तर उत्तरेच्या भिंतीवरील घड्याळ नशिबी असलेल्या संपत्तीचे प्रमाण घटवते. दक्षिणेची भिंती ही घड्याळाची योग्य दिशा समजली जाते. या दिशेला लावलेले घड्याळ त्या कुटुंबाची तिजोरी कधीही रिकामी होऊ देत नाही.


तसेच जास्तीत जास्त बचत व गुंतवणूकही घडवून आणते. पश्चिमेच्या भिंतीवरील घड्याळही शुभ समजले जाते. बंद पडलेली किंवा अडखळत चालणारी भिंतीवरील घड्याळे नुकसानदायक असतात. अशी घड्याळे ताबडतोब काढून दुरुस्त करून पुन्हा भिंतीवर लावावीत. घरातील व कार्लयायातील सर्व घड्याळे एकच वेळ दाखवणारी असावीत. वेगवेगळ्या वेळा दाखवणारी घड्याळे घरात विसंवाद, मतभेद निर्माण करतात.

तात्पर्य : शुभ दिशेस टांगलेले व अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ त्या वास्तूसाठी हमखास लाभदायक ठरेल. 
- संजीवनी मुंदडा, धायरी
Powered By Sangraha 9.0