सध्याच्या काळात क्रीडा स्पर्धांमध्ये शिडाची जहाजे वापरली जातात. शिडाच्या जहाजात शिडे टांगण्यासाठी पुढच्या टाेकापासून मागच्या टाेकापर्यंतच्या मध्यरेषेवर अंतराअंतरावर मजबूत आणि उंच डाेलखांब उभे केलेले असतात. पाश्चिमात्य प्रकारच्या जहाजात या डाेलखांबावर एकाखाली एक असे आडवे वासे टांगलेले असतात. या वाशांच्या आधाराने जाड कापडाचे चाैकाेनी किंवा त्रिकाेणी तुकडे टांगतात व त्या तुकड्यांच्या खालच्या काेपऱ्यांना लांब दाेर बांधतात. हे दाेर पुढे-मागे ओढून टांगलेल्या शिडाला पाहिजे त्या उभ्या पातळीमध्ये धरून ठेवता येते. वासे टांगण्यासाठी उभ्या डाेलखांबावर एकाखाली एक अशा अनेक कप्प्या बांधून ठेवलेल्या असतात. वासा वरखाली करण्याचा दाेर या कप्पीवरून नेलेला असताे. भारताच्या समुद्रकिनाऱ्याने जाणाऱ्या बहुतेक जहाजांवर एकच डाेलखांब असताे व त्यावर एकच त्रिकाेणी शीड टांगलेले असते.जहाज चालविताना वारा बराेबर मागच्या दिशेने येत असला, तर सर्व शिडे वाऱ्याच्या दिशेच्या काटकाेनात धरून ठेवतात म्हणजे वाऱ्याचा सर्व दाब जहाजाला पुढे नेण्यासाठी उपयाेगी पडताे. वारा तिरप्या दिशेने येत असला, तरी शिडांची पातळी जरूर तितकी फिरवून वाऱ्याच्या दाबाचा चांगला उपयाेग करून घेता येताे. वारा अगदी समाेरून येत असेल, तर शिडाचा उपयाेग करता येत नाही व वारा मुळीच नसेल, तरीही शिडाचा उपयाेग हाेत नाही. वारा समाेरून येत असेल तेव्हा जहाज मागे जाऊ नये म्हणून सर्व शिडे गुंडाळून खाली उतरवून ठेवतात व जहाज मागे जाऊ नये म्हणून शक्य असेल तेथे नांगर टाकतात आणि वल्ह्यांच्या मदतीने जहाजाला शक्य तितके स्थिर ठेवतात.शिडाच्या जहाजाला अनुकूल वारा मिळाला, तर ते ताशी 20 नाॅटपर्यंतच्या वेगाने जाऊ शकते व वारा तिरपा असेल, तर ताशी 5 नाॅटच्या वेगाने नेता येते. वाऱ्याच्या शक्तीने चालणाऱ्या जहाजाला फारसा खर्च लागत नाही, परंतु लांब अंतरावर जाण्यासाठी पुष्कळ वेळ लागताे.प्रत्येक जहाजाच्या मागच्या बाजूस एक सुकाणू बसविलेले असते, त्याचा सर्व भाग नेहमी पाण्यातच राहताे. या सुकाणूला पाहिजे तसे फिरविले म्हणजे चालू जहाज ठराविक मार्गावरून नेता येते. प्रत्येक जहाजावर हाेकायंत्र असते व मार्गावरील समुद्रकिनाऱ्यांचे नकाशे असतात. त्यांच्या मदतीने जहाज चालविणाऱ्या अधिकाऱ्याला आपला मार्ग समजताे.किनाऱ्यापासून लांब अंतरावर जाणाऱ्या जहाजात सर्व माणसांना बरेच दिवस पुरेल इतकी अन्नसामग्री, इंधन व गाेडे पाणी बराेबर घेऊन जावे लागते. उतारूंना बसण्यासाठी व निजण्यासाठी स्वच्छ काेरडी जागा असलेल्या खाेल्या वरच्या मजल्यावर असतात व त्यांचे सामान ठेवण्यासाठी खालच्या भागात काेठारे असतात.