चातक पक्षी

30 Dec 2020 12:34:27
 
bhj_1  H x W: 0
 
हा एक बगळ्याच्या जातीचा पक्षी आहे. हा पक्षी वेत बांबूंच्या वनात, झुडुपांच्या रानात राहताे. याच्या पिसाऱ्याचा रंग काहीसा तपकिरी काळा असताे. ताे वेत बांबूंच्या रंगाशी इतका जुळणारा असताे की, त्यामुळे ताे पक्षी सहजासहजी वेतबांबूंच्या झुडुपातून शाेधूनही सापडणे कठीण. जेव्हा एखादे संकट आपल्यावर येणार आहे, असे या पक्ष्याला वाटते, तेव्हा हा पक्षी स्तब्ध उभा राहताे आणि आपली चाेच आकाशाकडे उंचावून पाहात राहताे. त्याच्या गळ्याच्या खालच्या भागाचा रंगही सभाेवतीच्या वेत बांबूंच्या रंगाशी जुळणारा असताे. जेव्हा वारा जाेराने वाहताे तेव्हा वेत आणि बांबू हलायला लागतात तेव्हा हा पक्षीही त्यांच्याप्रमाणेच हलायला लागताे.त्यामुळे हा पक्षी शिकाऱ्याला ओळखता येत नाही व त्याचे प्राण वाचतात.
Powered By Sangraha 9.0