अण्णा भाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे असे हाेते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले हाेते. साठे हे मार्क्सवादीआंबेडकरवादी प्रवृत्तीचे हाेते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव हाेता, पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे याेगदान हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडाेळा घेता येताे. आजही माेठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशाेधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयु्नत महाराष्ट्राची चळवळ लाेकमानसात रूजविण्याचे महान आणि महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, काेकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागातील हजाराे ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लाेक प्रेरित झाले. त्यांचे साहित्य तुम्ही नक्की वाचा.