पळसाचे पान

14 Dec 2020 13:14:49
 
वक्फ._1  H x W:
 
शहरातील मुलांना पळसा संबंधीचे ज्ञान फक्त ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीपुरतेच मर्यादित असण्याची श्नयता असते. पळसाची झाडे जंगलात माेठ्या प्रमाणात आढळतात.या झाडांना जंगल ज्याेत असेही म्हणतात. पळसाच्या पानांपासून पत्रावळी, द्राेण तयार केले जातात. काेकणात पळसाच्या पानांपासून घाेंगडी बनवली जाते.ही घाेंगडी पावसापासून संरक्षण करते. या झाडांच्या मुळांपासून दाेर बनविला जाताे. गुरेही पळसाची पाने खातात.त्याचे लाकूड पाण्यात बरेच दिवस टिकत असल्याने हाेड्या, तराफे बनविण्यासाठी त्याचा उपयाेग हाेताे. लाखेच्या किड्यांची या झाडावर जाेपासना हाेऊ शकते. पळस औषधी आहे. त्याची पाने गरम करून गळवावर बांधतात. त्यामुळे सूज कमी हाेते. या झाडांतून एक प्रकारचा गाेंद बाहेर पडताे.हा गाेंद अतिसारावर गुणकारी आहे.
 
Powered By Sangraha 9.0