पुण्यात रानगवा आणि प्राणघातक गवगवा!

12 Dec 2020 12:36:25
रानगवा हा धष्टपुष्ट जीव असला, तरी ताे खूप लाजरा, बुजरा असताे, त्याच्याभाेवती घाेळके जमले, तर त्याच्यावर विलक्षण तणाव येऊ शकताे, हे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये काेणाला ना काेणाला कळायला हवं हाेतं.
 
ff_1  H x W: 0
 
पुण्यात काेथरूडसारख्या भागात वाट चुकून रानगवा शिरला आणि एकच हलकल्लाेळ उडाला. अख्खा दिवसभर सगळीकडे रानगव्याचीच बातमी हाेती. व्हाॅट्सअ‍ॅपवर रानगव्याचे फाेटाे आणि व्हिडिओ पडत हाेते. दुसऱ्या दिवशी बातमी आली ती रानगवा निव्वळ थकव्याने मरण पावल्याची. रानगवा ज्यांनी पाहिला असेल, त्यांचा ताे थकू शकताे यावर विश्वास बसणं कठीण. अगदी लाडाकाेडात पाेसलेल्या बैलापेक्षाही धष्टपुष्ट असलेल्या रानगव्यात राक्षसी ताकद असते. ताेही मरण पावण्याइतका थकावा, असं काय घडलं असेल? खरंतर ताे शारीरिक थकव्याने गेला नाही, मानसिक थकव्याने गेला. हा थकवा त्याला पुण्यात आला, हे दु:खद आहे... म्हणजे पुणेकरांसाठी दु:खद आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये सर्वसामान्य माणसं राहतात. पण, पुणे, डाेंबिवली आणि पार्ल्याचे काही भाग इथे राहणाऱ्या माणसांना असं वाटतं की आपण काहीतरी विशेष आहाेत. गतजन्मीचं पुण्य म्हणूनच आपला या नगरीत जन्म झालेला आहे. आपण सगळ्यात सुसंस्कृत आहाेत, अशीही त्यांची समजूत आहे. अशा शहरात आलेल्या रानगव्याला लाेकांनी फार सुसंस्कृतपणे वागवायला हवं हाेतं. हा धष्टपुष्ट जीव असला तरी ताे खूप लाजरा, बुजरा असताे, त्याच्याभाेवती घाेळके जमले तर त्याच्यावर विलक्षण तणाव येऊ शकताे, हे या सुसंस्कृत शहरांमध्ये काेणाला ना काेणाला कळायला हवं हाेतं. तेवढं भान ठेवलं असतं तर त्या गव्याची अशी जाहीर माफी मागायची पाळी आली नसती.  
Powered By Sangraha 9.0