महिलांच्या कार्यक्रमांचा साेशल मीडियावर जाेर

    01-Dec-2020
Total Views |
पुरुषांच्या मक्तेदारीला  आव्हान; चांगल्या दर्जामुळे सबस्क्रायबर्समध्येही वाढ
 
.,._1  H x W: 0
 
 
बंगळुरू, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : साेशल मीडियावर विनाेदवीरांची कमतरता नाही; पण पुरुषांची म्नतेदारी असलेल्या या क्षेत्रात आता महिलांनीही आव्हान उभे करणे सुरू केले आहे. काेराेनाच्या काळात सध्या अनेकांना घरी राहावे लागत असल्यामुळे काही महिलांनी त्यांच्यातील ही क्षमता वापरणे सुरू केले आहे.गृहिणीची जबाबदारी निभाविण्यात अनेक वर्षे व्यस्त असलेल्या माेनिका कुंडू या बंदी येण्यापूर्वी ‘टिक-टाॅक’वर खूप प्रसिद्ध झाल्या हाेत्या. त्यांच्या मुलासह त्यांनी सादर केलेले कार्यक्रम पाहणारे त्यांचे एक लाख 40 हजार फाॅलाेअर्स आता एमए्नस टकाटकवर त्यांना फाॅलाे करतात.मानवी संसाधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवानी कपिला यांचे त्यांच्या सासूबराेबरचे ‘माेज’ या अ‍ॅपवरील व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फाॅलाेअर्सची संख्या आहे चार लाख दहा हजार. यूट्यूबवरील लाेकप्रिय काॅमिक स्टार म्हणून निहारिका सिंह या प्रसिद्ध झाल्या आहेत. राेजच्या आयुष्यात महिलांबाबत घडणारे गमतीदार प्रसंग त्या सादर करतात.साेशल मीडियावर विनाेदी कार्यक्रम सादर करणे ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नसून, महिलाही त्यांच्याबराेबरीने असे कार्यक्रम सादर करू शकतात हे या उदाहरणांवरून दिसते.सध्या गाजत असलेल्या महिला काॅमिक स्टारना त्यांच्या आधीच्या पिढीतील आदिती मित्तल, नीति पलटा आणि कनिझ सुक्रा यांच्यावरून प्रेरणा मिळाली आहे. गेल्या दशकात या तिघी स्टँडअप काॅमेडी करण्यासाठी प्रसिद्ध हाेत्या. नव्या पिढीतील अनेक महिला त्यामुळे या क्षेत्राकडे वळाल्या आहेत.
साेशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद त्यांना नवे कार्यक्रम सादर करण्याचा उत्साह देताे आहे.‘स्टँडअप काॅमेडीच्या क्षेत्रात पूर्वी तीन ते चार महिलाच हाेत्या. त्यांनी त्यांचे कार्यक्रम यूट्यूबवरअपलाेड करायला सुरुवात केल्यावर आम्हाला असे काही कार्यक्रम हाेत असल्याचे समजले. त्यांच्यापासून स्फूर्ती घेत अन्य महिलांनीही कार्यक्रम सुरू केले. पूर्वी या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व हाेते. आता हे चित्र बदलत आहे,’ अशी माहिती रम्या रामपरिया यांनी दिली. त्याही विनाेदी कार्यक्रम सादर करतात. मात्र, हा प्रवास महिलांसाठी साेपा नव्हता.अनेकदा त्यांना ‘ट्राेलधाडी’बराेबरच कुत्सित शेरेबाजीचाही सामना करावा लागला. मात्र, त्याला न घाबरता या महिला पाय राेवून उभ्या राहिल्या हे काैतुकास्पद असल्याचे रम्या म्हणतात.