नाे ट्रम्प आणि कचऱ्याची पेटी

    01-Dec-2020
Total Views |
आपल्याकडे तीस-पस्तीस टक्के मतं मिळवून बहुमतात आलेले लाेक आणि त्यांचे चेले जग जिंकल्याच्या आविर्भावात वावरतात आणि विराेधाचा सूर दिसला की, ताे दडपायला धावतात. त्या तुलनेत अमेरिकेतली विचारस्वातंत्र्याची मुभा काैतुकास्पद वाटते.
 

bnhj_1  H x W:
 
अमेरिका हा भन्नाट देश आहे. इथे जवळपास निम्म्याहून अधिक लाेक हे डाेनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या गावावरून ओवाळून टाकलेल्या मनुष्याला पाठिंबा देतात. उरलेले निम्मे लाेक ट्रम्प यांचा दुस्वास करतात. ती भावना ते माेकळेपणाने व्यक्त करतात आणि तिला वाट करून देताना गंमतचित्रं, व्यंगचित्रं, लेख या सगळ्यांचा मन:पूत वापर करतात. आश्चर्य म्हणजे ज्यांचं ट्रम्पवर प्रेमच जडलेलं आहे, अशा लाेकांना ही टीका खुपत असली तरी ती करण्याचं स्वातंत्र्य ती मंडळी हिरावून घेत नाहीत. आपल्याकडे तीस-पस्तीस टक्के मतं मिळवून बहुमतात आलेले लाेक आणि त्यांचे चेले जग जिंकल्याच्या आविर्भावात वावरतात आणि विराेधाचा सूर दिसला की ताे दडपायला धावतात. यांच्या त्रिखंडनायकाचं महान देवत्व सगळ्या विश्वाने विनातक्रार स्वीकारलंच पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यात व्यंगचित्रं किंवा मीम्समधून तर थेट भावनाच दुखावतात आणि समाेरच्याला तुरुंगात टाकण्याची भाषा किंवा व्यवस्था हाेते. या पार्श्वभूमीवर हे स्वातंत्र्य फार माेलाचं आहे. इथे ट्रम्प यांच्यावर केलेले विनाेद पाहा. एकीकडे हाॅलिवूडच्या परिसरातल्या एका फलकावर आगीचा धाेका टाळण्यासाठी धूम्रपान करू नका या सूचनेबराेबर काेणत्याही वेळी ट्रम्प नकाे (त्यांना निवडून देऊ नका) अशी सूचनाही केली आहे. दुसरीकडे फाेटाेशाॅपच्या साह्याने बनवलेल्या गंमतफाेटाेत अमेरिकी प्रातिनिधिक अध्यक्षांच्या चेहऱ्यांनी नटलेल्या माऊंट रशमाेरवर ट्रम्प यांची स्थापना करण्यात आली आहे, कचऱ्याच्या डब्याच्या स्वरूपात.