धूम्रपान, मद्यपान न करणारे गाव

    01-Dec-2020
Total Views |
 
nmi_1  H x W: 0
 
सहारनपूर, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : उत्तर प्रदेशच्या देवबंद तालुक्यातील मिर्झापूर या पवित्र गावात काेणीही धूम्रपान किंवा मद्यपान करीत नाही. विशेष म्हणजे मिर्झापूर गावाची इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये व्हर्च्युअल व्हिलेज म्हणजे पवित्र गाव म्हणून नाेंद झाली आहे.10,000 लाेकसंख्या असलेले मिर्झापूर गाव मद्यपान, धूम्रपान आणि मांसाहारापासून पूर्णपणे मुक्त असलेले गाव मिर्झापूर देवबंद-मंगलाेर राेडवर आहे. या गावातील लाेक 500 वर्षांपासून धूम्रपान, मद्यपान, मांसाहार करीत नाहीत.इतकेच नव्हे तर तम गुण असलेले कांदा व लसूणसुद्धा खात नाहीत. हा सिद्ध पुरुष फकिरदास बाबांचा आशीर्वाद असल्याचे या गावाचे रहिवासी मानतात. बाबा फकिरदास राजस्थानमधून मिर्झापूरया गावात आले हाेते. ते ब्रह्मदेवाचे स्थान पुष्कर-अजमेर मार्गावरील इंद्रपूर येथून आले हाेते. हरिद्वारमधून परत येताना ते मिर्झापूर येथे आले हाेते व शिवमंदिरात मुक्काम केला हाेता व येथेच एका उंच टेकडीवर सिद्धकुटी आश्रम बांधला व कामयस्वरूपी वास्तव्यास हाेते. त्यांच्या स्मरणार्थ मिर्झापूरया गावात दरवर्षी यात्रा भरते. फकिरदास बाबांनी याच आश्रमात 500 वर्षांपूर्वी ‘गंठा (कांदा) लसन, तम्बाकु जाेई। मदिरा मांस तजे शिष्य काेई। साठा (आपला) धर्म रहेगा जबतक। मिरगापूर सुख पावेगा तब तक।।’ हा दाेहा लिहिला. याचे पालन मिर्झापूरचे रहिवासी आजही करतात. मिरगापूर हे गाव पर्यटन स्थळ जाहीर करण्याची मागणी अनेक आमदारांनी मध्य प्रदेश विधानसभेत केल्याचे आमदार संजय गर्ग आणि हाजी फजलू रहमान यांनी केली आहे.