क्रीडा प्रमाणपत्रासाठी नवी नियमावली

    01-Dec-2020
Total Views |
मंत्रालयातील आढावा बैठकीत सुनील केदार यांची माहिती
 
vb5_1  H x W: 0
 
मुंबई, 30 नाेव्हेंबर (आ.प्र.) : राज्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेतअसे प्रकार भविष्यात हाेणार नाहीत, यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.राज्यातील क्रीडा विभागाचा विभागनिहाय आढावा मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी केदार बाेलत हाेते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकाेरिया यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.राज्यात यापुढे बनावट प्रमाणपत्र देण्याचे काेणाचे धाडस हाेणार नाही किंवा काेणी मागण्याची हिंमतही करणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येईल. नाेकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रभावी उपाययाेजना करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले. क्रीडा संकुलासाठी सपाट असेल अशीच जागा निवडावी. त्यामुळे येणारा निधी सपाटीकरणासाठी खर्च न हाेता ताे इमारत उभारणीसाठी आणि क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपयाेगात आणता येईल, असे तटकरे यांनी सांगितले.