करन्सी नाेट प्रेसमध्ये नवी यंत्रसामग्री

    01-Dec-2020
Total Views |
जपानचे पथक कार्यवाहीसाठी दाखल : नाेटा, ई-पासपाेर्ट कामाला मिळणार गती
 
nhj_1  H x W: 0
 
नाशिक, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : येथील करन्सी नाेट प्रेसमध्ये येत्या पाच वर्षांत चाैदाशे काेटींची यंत्रसामग्री बसवली जाणार असून, प्रेस कामगारांच्या मेहनतीला नवीन यंत्रसामग्रीची साथ लाभल्यानंतर चलनी नाेटांचे उत्पादन माेठ्या प्रमाणात वाढणार आहे.सध्या जपानहून नवी यंत्रसामग्री दाखल झाली असून, ती बसवण्यासाठी जपानचे पथकही येथे दाखल झाले आहे. तीन महिने हे काम चालणार आहे.पहिल्या टप्प्यात दीड वर्षात साडेतीनशे काेटींची यंत्रसामग्री बसवल्यानंतर वर्षाला पंधराशे दशलक्षने नाेटांचे उत्पादन वाढणार आहे. सध्या वर्षाला साडेपाच ते सहा हजार दशलक्ष नाेटा येथे छापल्या जात आहेत.नाशिकराेडच्या ब्रिटिशकालीन आयएसपी प्रेसमध्ये ई- पासपाेर्ट इन-लेसाठीच्या निविदेला प्रेस महामंडळाच्या बाेर्डाने मान्यता दिली. त्यामुळे ई-पासपाेर्टचे उत्पादनही वर्षाला दीडवरून तीन काेटींपर्यंत जाईल.देशाची नाेटांची गरज भागवणाऱ्या नाशिकराेडच्या प्रेसमध्ये 2012 पासून आधुनिकीकरणाची मागणी हाेत आहे. ती लक्षात घेऊन ऑफसेट प्रिंटिंग, बीपीएस न्यूमराेटा, इन्टॅग्लिओ प्रिटिंग, नंबरिंग, फिनिशिंग अशी नवी यंत्रसामग्री बसवली जाणार आहे. साडेतीनशे काेटींच्या मशीन लाइनची ऑर्डर झाली आहे.सध्या प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, दाेनशे व पाचशेच्या नवीन डिझाइनच्या नाेटा छापल्या जात आहेत. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे त्यांचा दर्जा वाढणार आहे.आयएसपी प्रेसमध्ये ई-पासपाेर्टच्या इन-लेसाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या निविदेला प्रेस महामंडळाच्या बाेर्डाने मान्यता दिली.आता ई-पासपाेर्टचे उत्पादन वर्षाला तीन काेटींपर्यंत जाईल. त्यामध्ये आधीचे दीड काेटी पासपाेर्ट बदलून देणे आणि नवीन दीड काेटींची मागणी पूर्ण करणे समाविष्ट आहे.ई-पासपाेर्टसाठी लागणारे पन्नास टक्के इन-ले परदेशातून तयार हाेऊन नाशिकराेड प्रेसला येतील. मेक इन इंडियांतर्गत हैदराबाद व नाेएडा येथे उर्वरित इनले तयार हाेऊन सहा महिन्यांत नाशिकला आल्यावर 2021च्या पूर्वाधात देशाचा पहिला ई-पासपाेर्ट तयार हाेईल. पाेसपाेर्टच्या दाेन यंत्रांचे आधुनिकीकरण झाले आहे. तिसरे इर्म्पाेटेड यंत्र वर्षभरात येणार आहे.