भविष्याची सफर : म्युझिअम ऑफ फ्युचर

    01-Dec-2020
Total Views |
 
,लो._1  H x W:
 
उत्कृष्ट इमारती असलेल्या दुबईमध्ये 78 मीटर उंचीचे ‘म्युझियम ऑफ फ्युचर’ सर्वांपेक्षा वेगळे दिसून येते. हे डाेळा किंवा अंड्याप्रमाणे दिसते.त्याला भविष्याचे विचित्र घर सुद्धा म्हटले जात आहे. इमारतीचा भरीव भाग आपल्या सध्याच्या ज्ञानाला दाखविताे. त्याप्रमाणेच मध्ये जे रिकामेपण आहे ते या गाेष्टीचे प्रतीक आहे की, ज्याला आपण जाणत नाही ते म्हणजे भविष्य. यामध्ये प्रत्येक स्टील किंवा फ्रेमला विशेष आकारात आणि मापात कापून लावले जात आहे. त्याच्या आराखड्यावर जे पॅनल लावले जात आहेत त्यामध्ये अरबी भाषेत काही लिहिले आहे. हीच अक्षरे म्यूझियमच्या खिडक्यांचे  काम करतील. दिवसा त्यातून प्रकाश आतमध्ये येईल. तसेच रात्री प्रकाश आतून बाहेर पडेल आणि सुंदर दृश्य निर्माण करेल.या सात मजली इमारतीमध्ये एका मजल्यावर भविष्यातील उपकरणे असतील. ज्यांच्यातून शक्यतांनी  भरलेल्या भविष्याचा अनुभव मिळण्याचा प्रयत्न केला जाईल. असा दावा केला जात आहे की, येथे दरवर्षी 10 लाख पर्यटक येतील.यामध्ये प्रकाशासाठी 14 किमी लांबी भरेल इतके एलईडी लाइट लावले जाणार आहेत. 78 मीटर उंच असलेल्या या इमारतीच्या इंजिनीअर्सचे म्हणणे आहे की, गणिताच्या मदतीने हे खास डिझाइन तयार करणे अश्नय काम हाेते. कारण 1 मिमीचा फरकही आव्हान ठरू शकत हाेता. ही इमारत ब्रिटनच्या इंजिनीअरिंग फर्मच्या देखरेखीखाली तयार हाेत आहे.तिचा आराखडा 24 हजार स्टीलच्या राॅड्सपासून तयार झाला. ऑक्टोबर  2020 मध्ये या इमारतीच्या लाेकार्पणाची तारीख हाेती. पण आता अजून काही काळ लागणार आहे. पण हे अजब प्रकारचे म्युझियम जणू लाेकांना भविष्याची सहल घडवत आहे.