ठाण्यात आजपासून कुष्ठराेग व क्षयराेग रुग्णशाेध माेहीम

    01-Dec-2020
Total Views |
महापालिका करणार 420 पथकांद्वारे सहा लाख नागरिकांचे सर्वेक्षण
 
nm,i_1  H x W:
 
ठाणे, 30 नाेव्हेंबर (आ.प्र.) : क्षयराेग व कुष्ठराेगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आराेग्य विभाग मंगळवारपासून (1 डिसेंबर) संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शाेधमाेहीम अभियान राबवणार आहे. 16 डिसेंबरपर्यंत हे अभियान चालणार असून, या माेहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख यांनी केले आहे.या माेहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात वैद्यकीय आराेग्य अधिकारी डाॅ.आर. के. मुरुडकर, शहर क्षयराेग अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांच्यासह पालिकेचे अधिकारी सहभागी झाले हाेते. गणेश देशमुख यांनी माेहिमेच्या अंमलबजावणीबाबत या बैठकीत विविध सूचना केल्या.सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे.क्षयराेग व कुष्ठराेग या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना केल्या आहेत. ठाण्यात अतिजाेखमीच्या ठिकाणी एकूण 420 पथके शहरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याची क्षयराेग व कुष्ठराेग तपासणी करणार आहेत, तसेच या राेगाबाबतच्या लक्षणांची माहितीही या पथकांमार्फत देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 6 लाख नागरिकांचे सर्वेक्षण या माेहिमेत करण्यात येणार असून, आजारांची लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची माेफत एक्स-रे, थुंकी तपासणी, सीबीनेट तपासणी जवळच्या सरकारी दवाखान्यात करून राेगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरित माेफत औषधाेपचार चालू करण्यात येणार आहेत.या शाेधमाेहिमेत आराेग्य कर्मचारी, आशा सेविका व स्वयंसेविकांचे गट तयार करण्यात आले आहेत. या गटांमार्फत घराेघरी भेट देऊन क्षयराेग व कुष्ठराेगासंबंधी पूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या माेहिमेत नागरिकांनी सहभागी हाेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.