बंदूक स्वातंत्र्याचं फळ

    01-Dec-2020
Total Views |
विरळ वस्तीच्या अमेरिकेत जनावरांपासून आणि चाेर-दराेडेखाेरांपासून वाचण्यासाठी बंदूक आवश्यक आहेच, पण सरसकट बंदूकस्वातंत्र्य आवश्यक नाही.त्याविराेधात काेणत्याही अध्यक्षाने काही करायचं ठरवलं की गनलाॅबी विराेधात उसळून येते.
 
nbvgy_1  H x W:
 
अमेरिका हा अनेक बाबतींत अत्यंत पुढारलेला देश आहे. ताे निव्वळ आर्थिकदृष्ट्या प्रगत नाही, तर मानवी संस्कृतीच्या संदर्भातही काही भागांपुरता का हाेईना पुढारलेला आहे. मात्र, हा देश काही संदर्भात अत्यंत मागासलेला आहे.भारतासारख्या अमेरिकेच्या तुलनेत सर्वार्थाने मागासलेल्या देशातही स्वैर बंदूकस्वातंत्र्य नाही.इथेही यूपी-बिहारसारख्या मागासलेल्या राज्यांमध्ये सर्रास गावठी बंदुका, कट्टे उपलब्ध असतात, पण ताे काही समाजनियम नाही. अपवादच आहे.अमेरिकेत मात्र अधिकृत बंदूकस्वातंत्र्य आहे.
काेणीही बंदूक बाळगू शकताे. अमेरिका ज्या हिंसक पद्धतीने वसवली गेली, तिथे मूलनिवासी रेड इंडियनांचं ज्या प्रकारे शिरकाण केलं गेलं आणि नंतर गाेऱ्यांच्या टाेळ्या एकमेकांशी जशा भिडल्या, भांडल्या, ते पाहता त्या काळात बंदूक बाळगणं हे जीवरक्षणासाठी आवश्यक हाेतं. आताही अमेरिकेचं क्षेत्रफळ आणि लाेकसंख्या पाहता लाेकवस्ती कमालीची विरळ आहे. अत्यंत निर्जन भासणाऱ्या प्रदेशांत, आसपास मैलाेन्मैल वस्ती नाही अशा ठिकाणी घरं असतात. तिथे जनावरांपासून आणि चाेरदराेडेखाेरांपासून वाचण्यासाठी बंदूक आवश्यक आहेच, पण सरसकट बंदूकस्वातंत्र्य आवश्यक नाही. त्याविराेधात काेणत्याही अध्यक्षाने काही करायचं ठरवलं की गनलाॅबी विराेधात उसळून येते.याचा परिणाम इथल्या या हास्यचित्रात दिसताेय.हा मुलगा वडिलांना त्यांची गन परत देताना सांगताेय, शाळेत जरा प्राॅब्लेम हाेता, आता मी ताे साेडवून टाकलाय! दुर्दैवाने हा फक्त विनाेद नाही, अमेरिकेतली ही भीषण वस्तुस्थिती आहे.