मानवी शरीर नावाचं गूढ

01 Dec 2020 12:39:07
आपण श्वासाेच्छ्वास करताे, जाेवर ताे सुरू आहे ताेवर आपण जिवंत आहाेत. ताे कसा हाेताे, याची काही कल्पना आहे का तुम्हाला? आपल्या एका नाकपुडीतून जास्त हवा खेचली जाते आणि दुसरीतून कमी. हे चक्र दर 15 मिनिटांनी बदलत असतं.
 
nhu_1  H x W: 0
 
असं म्हणतात, द माेअर अँड माेअर यू बिकम पर्सनल, द माेअर अँड माेअर यू बिकम युनिव्हर्सल. तुम्ही जेवढे व्यक्तिगत जीवनात आत शिरत जाता, तेवढे वैश्विक हाेत जाता. हे थाेडं आश्चर्याचं वाटेल, पण ते खरं आहे. अणुरेणूंच्या रचनेपर्यंत पाेहाेचल्यावर लक्षात येतं की विश्वाची रचना अशीच आहे. अणुरेणूंमध्येही विश्व वसलं आहे आणि कदाचित आपलं विश्वही काेणाच्या तरी अणुरेणूंचा भाग असेल. आपलं सगळं आयुष्य शरीराबराेबरच व्यतीत हाेतं. शरीर संपलं की आपण संपताे. आत्मा-परमात्मा मानणारे असाल तरी त्या अस्तित्वालाही शरीराविना काहीच अर्थ नाही. हे आपलंच शरीर तरी आपल्याला किती समजतं? त्याबद्दल तरी आपल्याला काय माहिती असतं? इथली दाेन उदाहरणं पाहा. आपल्यासारख्या ऊष्ण हवामानाच्या देशात थंडगार हवा मिळाली तर झाेप काय छान लागते! हाे ना! उकाड्याने गदमदलेल्या हवेत झाेपण्यापेक्षा थंड झुळकांमध्ये झाेपणं सुखाचं, पण विज्ञान याच्या उलट सांगतं. तुमची झाेपेची खाेली जेवढी गार तेवढी तुम्हाला वाईट स्वप्नं पडतात. खाेली ऊबदार असेल तर चांगली स्वप्नं पडतात. आपण श्वासाेच्छ्वास करताे, जाेवर ताे सुरू आहे, ताेवर आपण जिवंत आहाेत. ताे कसा हाेताे, याची काही कल्पना आहे का तुम्हाला? आपल्या  एका नाकपुडीतून जास्त हवा खेचली जाते आणि दुसरीतून कमी. हे चक्र दर 15 मिनिटांनी बदलत असतं. आहे ना आश्चर्यकारक!
 
Powered By Sangraha 9.0