एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ

    01-Dec-2020
Total Views |
माणूस फक्त माणसांमाणसांतल्या सहकाराच्याच पायरीपर्यंत पाेहाेचला आहे. अजून त्याला बाकीच्या सृष्टीला साेयरे मानून जगण्याची कला अवगत नाही.इतर प्राणिमात्रांमध्ये हे सहकार्य पहिल्यापासून आहे.
 
xsef_1  H x W:
 
माणसाला वाटतं की, जगातले सगळे महत्त्वाचे शाेध त्याने लावले आहेत.खरंतर तसं काही नाही. ताे कमालीची बुद्धिमत्ता वापरून जी कामं करताे, ती कामं अनेक प्राणी, पक्षी, सूक्ष्म कीटक कसलीही बुद्धी नसताना निव्वळ स्वयंप्रेरणेने करतात. मुंग्यांच्या शिस्तीची बराेबरी माणूस करू शकत नाही आणि मधमाश्यांच्या पाेळ्यासारखं काही इतक्या मूलभूत साधनांच्या साह्याने उभारू शकत नाही. साधा सुगरणीचा खाेपा बनवणंही आपल्याला सहज शक्य नाही. माणसाचं सगळं अस्तित्त्व हे समुदायावर अवलंबून आहे. सहकार हे मनुष्यजातीच्या यशाचं मर्म आहे.त्यामुळे माणसाला वाटतं की, हाही त्याचाच शाेध आहे. निसर्गात पाहिलं की लक्षात येतं, माणसाच्या जन्माच्या आधीपासून इथे सहकाराची भावना आहे. माणूस फक्त माणसांमाणसांतल्या सहकाराच्याच पायरीपर्यंत पाेहाेचला आहे. अजून त्याला बाकीच्या सृष्टीला साेयरे मानून जगण्याची कला अवगत नाही. इतर प्राणिमात्रांमध्ये हे सहकार्य पहिल्यापासून आहे. इथलं हे दृश्य पाहा. इथे हत्ती झेब््रयांना अंघाेळ घालतायत. मागे जिराफ नंबर लावून उभा आहे. हे काही सर्कशीतलं दृश्य नाही. माणसांनी पढवून चाललेलं नाही काही. ही निसर्गातली उपजत प्रेरणा आहे सहकाराची. म्हशीच्या पाठीवर पक्षी बसतात आणि तिच्या अंगावरचे किडे खातात, हे परस्परसहकार्याचंच उदाहरण आहे. जंगलात शिकारी प्राणी येताच झाडावरची माकडं खुसपुसाट करतात, भेकरं हंबरतात आणि सगळ्या जंगलाला सावध करतात, ती याच प्रेरणेने.