सर्व राेगांचे आगार

01 Dec 2020 12:31:14
हा इथला महाबर्गर आणि त्याच्याबराेबर बटाट्याच्या कापांचा म्हणजे फ्रेंच फ्राईजचा पर्वत पाहिल्यावर असं वाटतं की, हे सगळं आपण खाऊ शकलाे तर काय मजा येईल! अर्थात, हा बर्गर काही एका माणसाच्या खाण्याचा नाही. हा पार्टी बर्गर आहे.
 
vbhgy_1  H x W:
 
हा भला माेठा बर्गर पाहिल्यावर अनेकांच्या ताेंडाला पाणी सुटलं असेल. काहींच्या मनात मात्र बापरे, एवढ्या कॅलरीज, असाच विचार आला असेल. बर्गर, पिझा यांसारख्या खाण्यावर सगळीकडच्या आहारशास्त्रींचे भयंकर आक्षेप आहेत. पाेटासाठी, स्वास्थ्यासाठी जे जे वाईट ते ते सगळं इथे एकवटलेलं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. ते काही प्रमाणात खरंही आहे. चरबीयुक्त खाणाऱ्या माणसाचं काम शरीर कष्टाचं नसेल तर एवढी चरबी ताे पचवणार कसा, असा प्रश्न निर्माण हाेताे. त्या चरबीचा थर त्याच्या शरीरावर बसताे. या थरावर आणखी थर चढत जातात. या चरबीतून अनेक राेग तयार हाेतात. डायबिटीस आणि हृदयराेग यांना तर हे थेट निमंत्रण आहे. काेलेस्टेराॅलचं प्रमाण वाढण्यापासून मैद्यामुळे, फायबर्सअभावी बद्धकाेष्ठ हाेण्यापर्यंतचे दुष्परिणाम या खाण्यातून हाेतात.तरीही हे खाणं अनेकांना प्रिय आहे. माणूस कितीही कॅलरी काॅन्श्यस असाे, हे अन्न पाहिल्यावर त्याच्या ताेंडाला पाणी सुटतंच. हा इथला महाबर्गर आणि त्याच्याबराेबर बटाट्याच्या कापांचा म्हणजे फ्रेंच फ्राईजचा पर्वत पाहिल्यावर असं वाटतं की, हे सगळं आपण खाऊ शकलाे तर काय मजा येईल! अर्थात, हा बर्गर काही एका माणसाच्या खाण्याचा नाही. हा पार्टी बर्गर आहे. यात आठ दहाजण आरामात जेवतील. असे भव्य आकाराचे पदार्थ एकट्याने संपवण्याच्या स्पर्धा असतात अमेरिकेत आणि चक्क त्या जिंकणारे खादाडखाऊ महानुभावही आहेत तिथे!
 
Powered By Sangraha 9.0