आठ हजार टन फ्लाय अ‍ॅश रेल्वेद्वारे विदर्भातून बेंगळुरूकडे रवाना

    01-Dec-2020
Total Views |
विदर्भातील पहिलाच प्रयाेग : बांधकामात हाेणार उपयाेग
 
nm,o_1  H x W:
 
नागपूर, 30 नाेव्हेंबर (वि.प्र.) : विदर्भात माेठ्या प्रमाणात असलेल्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून निघणारी राख (फ्लाय अ‍ॅश) नाममात्र दराने का हाेईना बेंगळुरूतील एका कंपनीने खरेदी केली असून, रेल्वेने 8 हजार टन राख तिथे पाठण्यात आली.औष्णिक वीजनिर्मिती कारखान्यातून निघणारी राख ही माेठी समस्या आहे.ही राख परिसरातील लाेकवस्तींसाठी धाेकादायक ठरत आहे. यावर उपाय म्हणून तिचा उपयाेग वीट तयार करण्यासाठी आणि रस्ते बांधकामात केला जात आहे. सरकारने आता इमारत बांधकामातही फ्लाय अ‍ॅश वापरण्याची परवानगी दिली आहे. त्याचा लाभ घेत बेंगळुरूतील अ‍ॅश टॅग कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील एका खासगी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकडून नाममात्र दरात राख खरेदी केली आहे.मध्य रेल्वेने दाेन टप्प्यांत 116 मालडब्यांतून 7800 टन राख बेंगळुरूला रवाना केली. आता चंद्रपूर औष्णिक केंद्रातील राखही मालगाडीने पाठवण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत.फ्लाय अ‍ॅश वापरून बांधकामाच्या विटा बनवण्याचा उद्याेग नागपूरसह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये चालताे. यासाेबतच बेंगळुरूतही असे उद्याेग आहेत. राज्यातील 16 औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांतून वर्षाला हजाराे टन फ्लाय अ‍ॅश तयार हाेते. राखेमुळे प्रदूषण वाढते. जमिनीवर टाकलेली राख हवेबराेबर उडत असल्याने नागरिकांना त्रास हाेताे. यावर उपाय म्हणून 10 लाखांहून अधिक लाेकसंख्या असलेल्या शहरांत इमारतीच्या बांधकामांत ही राख वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.